नागपूर : महापौर संदीप जोशी यांचा राजीनामा; दया शंकर तिवारी याना मिळेल संधी

Daya Shankar Tiwari & sandeep joshi

नागपूर : नागपूर (Nagpur) महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी (Sandeep Joshi) आज (२१ डिसेंबर) ला महापौरपदाचा राजीनामा दिला. आधीच ठरल्याप्रमाणे त्यांचा १३ महिन्यांचा कालावधी आज पूर्ण होत आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. यानंतर भाजपाकडून महापौर पदावर दया शंकर तिवारी (Daya Shankar Tiwari) यांना संधी मिळेल. (Sandeep Joshi resign from Mayor Daya Shankar Tiwari will be next Nagpur Mayor).

महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतरच महापौर निवडीच्यावेळी १३ महिने संदीप जोशी आणि १३ महिने दया शंकर तिवारी महापौर राहतील, असे सूत्र ठरले होते. त्याप्रमाणेच आता सत्तेत खांदेपालट होत आहे. महापौर संदीप जोशी आणि उपमहापौर मनीषा कोठे यांनी यांनी त्यांचे राजीनामे महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांच्याकडे दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER