नागपुरात मध्यरात्री तलवारधारी गुंडांचा हैदोस, वाहनांची मोडतोड; चौघांना अटक

Nagpur Goons Attack

नागपूर : नागपुरात गुरुवारी मध्यरात्री तलवारधारी गुंडांच्या टोळीने वनदेवीनगर, पंचवटीनगर आणि धम्मदीपनगर या परिसरात हैदोस घातला. प्रतिस्पर्धी टोळीने आपल्या सदस्याला मारहाण केल्याच्या कारणाने या टोळीने या तिन्ही वस्त्यांमध्ये दहशत निर्माण केली. नागरिकांच्या दुचाकी वाहने, कार आदी वाहनांची गुंडांनी यावेळी मोडतोड केली.

दरम्यान, हा सारा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून, या प्रकरणी संतप्त नागरिकांनी गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी करीत, यशोधरानगर पोलिस ठाण्यास घेराव केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी चार जणांना अटक केल्याची माहिती आज शुक्रवारी डीसीपी नीलोत्पल यांनी दिली. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे, असे ते म्हणाले.