नागपुरात कोरोनाचे आणखी ८ रुग्ण, रुग्णसंख्या पोहचली ३९५ वर

Nagpur corona -8 more patients,total reached 395

नागपूर : गुरुवारी सकाळच्या सत्रात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार नागपुरात ८ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. हे आठही रुग्ण मोमीनपुरा भागातील असून, सर्व कोरंटाईन होते. त्यामुळे आता नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या ३९५ वर पोहचली आहे. तर आतापर्यंत २८६ जणांनी कोरोनावर मात दिली असून, बरे होऊन घरी परतले आहेत.

ही बातमी पण वाचा:- कोरोनाचा हाहा:कार ! जगभरात रुग्णांची संख्या ४७,८९,२०५ तर भारतात १,१२,३५९

दरम्यान, बुधवारी एसआरपीएफच्या ६ जवानांसह नागपूरात आज १३ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्रयोगशाळांमधून प्राप्त झाला होता. यात ५ महिन्याच्या चिमुकल्याचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या बालकाच्या आई-वडीलांचा अहवाल हा निगेटीव्ह आला असून चिमुकल्याला मात्र कोरोनाने अलगद विळख्यात घेतले आहे. नागपूर शहरातील हा सर्वात कमी वयाचा कोरोना बाधित ठरला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला