काँग्रेसला सुरुंग : दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नागपूर : नागपुरात शिवसेना महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला खिंडार पडल्याची माहिती आहे. नागपुरातील शहर काँग्रेस कमिटीचे महासचिव अंगद हिंदोरे (Angad Hindore) यांच्यासह ५० ते ६० कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेचे संपर्कप्रमुख आमदार दुष्यंत चतुर्वेदी (Dushyant chaturvedi ) यांच्या नेतृत्वात या काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत भगवा झेंडा हाती घेतला आहे .

नागपुरात काँग्रेसला सुरुंग, दुष्यंत चतुर्वेदींच्या नेतृत्वात पदाधिकारी शिवसेनेतनागपूर महानगरपालिका (NMC) निवडणुकीसाठी शिवसेना पक्षबांधणीसाठी जोरात प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने काँग्रेसचे कार्यकर्ते फोडले . नागपुरात शिवसेना आणि काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे दोन्ही पक्षांत वादंग पेटले होते. त्यामुळे शेवटी त्या नगरसेवकांना शिवसेनेत परत जावं लागलं होतं. आता राज्याच्या उपराजधानीत शिवसेना काँग्रेसला सुरुंग लावत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER