राष्ट्रपतींकडून नागपूरचे क्रीडापटू विजय मुनीश्वर ‘द्रोणाचार्य’ पुरस्काराने सन्मानित

vijay-munishwar

नागपूर : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त क्रीडापटू व प्रशिक्षक नागपूरचे विजय मुनीश्वर यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले. क्रीडा क्षेत्रातील हे चारही मानाचे पुरस्कार मिळवणारे मुनीश्वर राज्यातील एकमेव. राष्ट्रीय क्रीडादिनाच्या पार्श्वभूमीवर आज मुनीश्वर यांना पॅरा पॉवरलिफ्टिंगमध्ये उल्लेखनीय योगदानाबद्दल मानाच्या द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राष्ट्रपतींनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला.

ज्या खेळामध्ये सामान्यापेक्षा जास्त शारीरिक क्षमतेची गरज असते, त्या खेळामध्ये दिव्यांग असतानाही मुनीश्वर यांनी देशासाठी अनेक मेडल जिंकले आहेत. सोबतच अनेक खेळाडू त्यांनी घडवले आहेत. खेळाडू म्हणून शिवछत्रपती आणि अर्जुन पुरस्कार, त्यानंतर प्रशिक्षक म्हणून दादोजी कोंडदेव आणि आता द्रोणाचार्य पुरस्कार त्यांनी प्राप्त केला आहे.

दरम्यान, मुनीश्वर यांच्यासह धर्मेंद्र तिवारी (तिरंदाजी), पुरुषोत्तम राय (अ‌ॅथलेटिक्स), शिव सिंह (बॉक्सिंग), रोमेश पठानिया (हॉकी), कृष्णकुमार हुड्डा (कबड्डी), विजय भालचंद्र मुनीश्वर (पॅरा लिफ्टर), नरेश कुमार (टेनिस), ओमप्रकाश दहिया (कुस्ती) यांना द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER