निवडणूक रॅलीनंतर गृहमंत्री अमित शहा बेपत्ता; दिल्ली पोलिसात तक्रार दाखल

Amit Shah

नवी दिल्ली :- देशात कोरोनाने (Coronavirus) अक्षरशः थैमान घातले आहे. बेड्स, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर्सचा तुटवडा जाणवत आहे. तरीही कोरोना महामारीच्या काळात निवडणूक रॅली काढण्यात आली. निवडणुका होताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) कुठे बेपत्ता झाले, काही ठाऊक नाही. ‘नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया’ (NSUI) संघटनेचे सरचिटणीस नागेश करियप्पा (Nagesh Kariyappa) यांनी अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी दिल्ली पोलिसात दाखल केली आहे.

महामारीच्या संकटात देशवासीयांची काळजी घेणे आणि सेवा करणे, हे राजकीय व्यक्तीचे काम आहे, असे करियप्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस हे करियप्पांची चौकशी करण्यासाठी आले होते, असा दावा NSUIचे राष्ट्रीय सचिव व प्रवक्ते लोकेश चूग यांनी केला. २०१३ पर्यंत राजकीय नेते नागरिकांना उत्तरासाठी बाध्य होते. परंतु, भाजप सत्ता आल्यानंतर हे चित्र पालटले. अशा भयावह काळात पंतप्रधानानंतर अतिशय महत्त्वाची व्यक्तीच मात्र गायब आहे, असेही चूग म्हणाले.

देशातील सर्वच नागरिक अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत, अशा काळात नागरिकांना आधार देणे आणि जबाबदारी घेणे हे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र, यात सरकार अपयशी ठरले आहेत. त्यामुळे ‘NSUI’चे सरचिटणीस नागेश करियप्पा यांनी गृहमंत्री बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सरकार देशाच्या प्रश्नांची उत्तरे लवकरात लवकर देईल, अशी आशा आहे, असे NSUIने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button