नगर जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर

Ahmednagar District Central Co-Operative Bank

नगर : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी शुक्रवारी (दि.१५) जाहीर केला आहे. २१ जागांसाठी २० फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. मंगळवारपासून (दि. १९) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. २५ जानेवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.

२७ जानेवारीला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्जांची छानणी होणार आहे. २८ जानेवारी रोजी वैध उमेदवारी अर्जांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याचबरोबर २८ जानेवारी ते ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. २० फेब्रुवारी मतदान व २१ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER