13 वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा नदाल पॅरिसमध्येच मास्टर्स स्पर्धेत मात्र सतत अपयशी

Rafael Nadal

* आठव्या प्रयत्नातही असफल
* प्रत्येकवेळी उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मात्र अंतिम फेरी एकदाच
*क्ले कोर्टचा बादशहा हार्डकोर्टवर निष्प्रभ
*झ्वेरेव्हने संपवले आव्हान

राफेल नदाल (Rafael Nadal) हा सर्वात यशस्वी टेनिसपटूंपैकी (Tennis). एक आहे. त्याने चारही ग्रँड स्लॕम स्पर्धा जिंकण्यासोबतच रॉजर फेडररच्या (Roger Federer). 20 ग्रँड स्लॕम अजिंक्यपदांचीही बरोबरी केली आहे आणि पॕरिसमधील रोलँ गरो (Roland Garros) टेनिस संकुलात खेळणारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा तर तब्बल 13 वेळा जिंकली आहे पण त्याच पॕरिसमध्ये खेळली जाणारी एटीपी मास्टर्स (Paris Masters) 1000 स्पर्धा मात्र तो एकदाही जिंकू शकलेला नाही.

टेनिस विश्वात नदाल जिंकू न शकलेली बहुतेक ही एकच स्पर्धा आहे. एरवी 20 ग्रँडस्लॕम अजिंक्यपदांसह तब्बल 86 विजेतेपदं त्याच्या नावावर आहेत पण त्यात पॕरिस मास्टर्सचे एकही विजेतेपद नाही. यंदासुध्दा नदाल हा दुष्काळ संपवू शकलेला नाही. चांगला खेळ करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारल्यावर तो अॕलेक्झांडर झ्वेरेव्हकडून 4-6, 7-5 असा पराभूत झाला.

याप्रकारे पॕरिस मास्टर्सच्या विजेतेपदाची प्रतिक्षा नदालसाठी कायमच राहिली आहे. 2007 पासून आठ प्रयत्नात तो एकदाही ही स्पर्धा जिंकू शकलेला नाही. या प्रत्येकवेळी त्याने पॕरिस मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीच्या पुढेच मजल मारली आहे पण विजेतेपदाने त्याला हुलकावणीच दिली आहे. 2007 मध्ये पहिल्याच प्रयत्नात तो येथे अंतिम फेरीत पोहोचला होता पण त्यानंतर तो अंतिम फेरीसुध्दा गाठू शकलेला नाही.

हे आश्चर्यच आहे की याच पॕरिसमध्ये रोलँ गॕरोच्या क्ले कोर्टवर फ्रेंच ओपनमध्ये तो जवळजवळ अपराजेय आहे. येथे 13 वेळा अजिंक्य ठरताना 100 विजय आणि फक्त दोन पराभव अशी त्याची कामगिरी आहे पण त्याच पॕरिसमधील दुसरी स्पर्धा तो आठ प्रयत्नात एकदासुध्दा जिंकू शकलेला नाही. असे का? काय फरक आहे या दोन स्पर्धात?

तर फ्रेंच ओपन खेळली जाते क्ले कोर्टवर, मोकळ्या मैदानात तर पॕरिस मास्टर्स खेळली जाते हार्ड कोर्टवर आणि इनडोअर. कदाचित हाच फरक नदालसाठी फरक करत असेल. हार्डकोर्टवरच्या इनडोअर स्पर्धांपैकी नदाल केवळ एकच स्पर्धा जिंकू शकलेला आहे. 15 वर्षांपूर्विचे माद्रिद स्पर्धेचे ते विजेतेपद होते.

याबाबत नदाल म्हणतो की, हा काही शाप वगैरे आहे असे मला वाटत नाही. एखादी मास्टर्स 1000 स्पर्धा जिंकू न शकणे आणि झ्वेरेव्हसारख्या खेळाडूकडून हरणे यात विचित्र असे काही नाही.

मात्र आता हे अपयश विसरुन नदालने पुढची स्पर्धा पॕरिस मास्टर्सवर लक्ष केंद्रीत केलेले आहे. ही स्पर्धा म्हणजे एटीपी फायनल्स आणि योगायोगाने ही स्पर्धासुध्दा नदाल आतापर्यंत जिंकू शकलेला नाही. आणखी एक यौगायोग हा की गेल्या दोन वर्षात झ्वेरेव्हनेच या दोन्ही स्पर्धात नदालचे आव्हान संपवले आहे. गेल्या वर्षीच्या एटीपी फायनल्सनंतर आता पॕरिस मास्टर्समध्ये त्याने पुन्हा एकदा नदालला मात दिली आहे आणि नदालविरुध्दच्या सात लढतीतील त्याचे हेच दोन विजय आहेत. सलग 12 सामने जिंकून आता तो अंतिम फेरीत आहे.

इनडोअर हार्डकोर्टवरील आपल्या अपयशाचे कारण बॕकहँडमधील दोष असल्याचे नदालला वाटते. तो म्हणतो की हार्डकोर्टवर खेळताना सहजपणे बॕकहँड फटके मारता येतील यासाठी मला काम करावे लागणार आहे. या मैदानांवर बऱ्याचदा मला बॕकहँडचा फटका चुकेल की काय असे वाटते.

पॕरिस मास्टर्स स्पर्धेतील नदालची कामगिरी आणि त्याला हरविणारा खेळाडू

2007 – अंतिम फेरी – डेव्हिड नालबंदियन
2008 – उपांत्यपूर्व फेरी – निकोलाय डेव्हिडेंको
2009 – उपांत्य फेरी – नोव्हाक जोकोवीच
2013 – उपांत्य फेरी – डेव्हिड फेरर
2015 – उपांत्यपूर्व फेरी – स्टॕन वावरिंका
2017 – उपांत्यपूर्व फेरी – फिलीप क्राजिनोव्हिक
2019 – उपांत्य फेरी – डेनिस शापोव्हालोव्ह
2020 – उपांत्य फेरी – अॕलेक्झांडर झ्वेरेव्ह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER