नदालचे विजयांचे सहस्रक पूर्ण

Rafael Nadal

टेनिस इतिहासातील चौथाच खेळाडू काॕनर्स, नदाल व फेडरर हे तिघे पुढे पॕरिस मास्टर्स स्पर्धेत घडवला इतिहास

राफेल नदाल (Rafael Nadal) …स्पेनच्या (Spain) या टेनिसपटूसाठी विक्रम काही नवीन नाहीत. मात्र त्याने पॕरिस मास्टर्स (Paris Masters). स्पर्धेत 5 नोव्हेंबरला फेलीसियानो लोपेझवर जो विजय मिळवला तो मात्र विशेष आहे. हा कुठल्याही स्पर्धेचा अंतिम सामना नव्हता तरीही हा सामना खास होता तो यासाठी की हा सामना जिंकून नदालने आपल्या विजयांचे सहस्रक पूर्ण केले. त्याचा हा 1000 वा विजय होता.

व्यावसायिक टेनिसमध्ये (Professional Tennis) हा टप्पा गाठणारा तो केवळ चौथाच खेळाडू आहे. नदालच्या आधी जिमी काॕनर्स, राॕजर फेडरर व इव्हान लेंडल यांनी एक हजार विजय पूर्ण केले आहेत.

पॕरिस मास्टर्स स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच सामन्यात त्याने लोपेझवर 4-6, 7-6 (5), 6-4 असा विजय मिळवला. फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर 13 व्यांदा नाव कोरल्यावर त्याचा हा पहिलाच विजय होता. या सामन्यात राफा’ने 16 एसेस लगावल्या आणि चार पैकी तीन ब्रेक पाॕईंट वाचवले आणि पॕरिसमध्ये पुन्हा एकदा इतिहास घडवला.

फ्रान्सच्या या राजधानीच्या शहरात रोलँ गॕरोवर नदालने विक्रमी 13 वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे. मात्र पॕरिस मास्टर्सचे विजेतेपद अद्याप त्याच्या हाती लागलेले नाही. 2007 मध्ये नदाल या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचला होता आणि सात वेळा तो या स्पर्धेत सहभागी झालाय आणि प्रत्येक वेळी त्याने किमान क्वार्टर फायनल गाठली आहे.

लोपेझविरुध्दचे मागचे दोन सामने नदालने गमावले होते. पण ते 2014 व 15 मधील होते.

एक हजार विजयांच्या टप्प्याबद्दल नदाल म्हणाला की, एक हजार सामने जिंकले म्हणजे मी आता म्हातारा झालोय. म्हणजे मी बऱ्याच दिवसांपासून चांगला खेळतोय. लागोपाठ बऱ्याच वर्षांपासून चांगला खेळ करत असल्यावरच हे शक्य आहे आणि म्हणून मी आनंदी आहे. या प्रवासात मला ज्यांनी काही मदत व सहकार्य केले आहे त्यांना मी धन्यवाद देतो.

नदालच्या आधी जिमी काॕनर्स, राॕजर फेडरर व इव्हान लेंडल यांनी एक हजार विजय पूर्ण केले आहेत. नदालने वयाच्या 16 व्या वर्षी 2002 मध्ये मलोर्का येथे रामोन डेलगाडोवर मिळवलेला विजय हा त्याचा पहिला विजय होता.

सर्वाधिक विजय

खेळाडू — विजय — कालावधी
काॕनर्स — 1274 — 1970- 95
फेडरर — 1242 — 1998 पासून
लेंडल —- 1068 — 1978- 94
नदाल —- 1000 — 2000 पासून

नदालचे विजयी टप्पे

विजय— विरुध्द ————- वर्ष —— स्पर्धा/ठिकाण

पहिला — रामोन डेल्गादो— 2002 – मलोर्का
100 वा- ह्युगो अर्मांडो —– 2005 – स्टूटगार्ट
200 वा- डेल पोत्रो ——— 2007 – मियामी
300 वा- इव्हा कार्लोव्हिक- 2008 – क्वीन्स क्लब
400 वा- थाॕमस बर्डीच —– 2009 – डेव्हिस कप
500 वा- इव्हान दोडीग —– 2011 – बार्सिलोना
600 वा- युआन डेल पोत्रो – 2013 – इंडियन वेल्स
700 वा- मार्टीन क्लिझान – 2014 – विम्बल्डन
800 वा- थाॕमस बेलुस्सी — 2016 – आॕलिम्पिक
900 वा- रिचर्ड गास्केट —- 2018 – फ्रेंच ओपन
1000 वा- फेलि. लोपेझ — 2020 – पॕरिस

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER