सुपर हॕपी नदालचे रोममध्ये विजेतेपदाचे ‘दशक’

Maharashtra Today

पुरूषांच्या टेनिसमध्ये नव्या पिढीचे खेळाडू समोर येत असल्याची आणि फेडरर- नदाल- जोकोवीच या त्रिकुटाची हुकुमत कमी होत असल्याची चर्चा असतानाच राफेल नदालने (Rafael Nadal). ‘अब भी है दम’ हे दाखवून देत इटालियन ओपनचे (Italian Open) विजेतेपद पटकावले आहे. या विजेतेपदासाठी त्याने त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी, नंबर वन नोव्हाक जोकोवीच याची चा 7-5, 1-6, 6-3 असा पाडाव केला आणि रोममधील (Rome) आपल्या यशाची दशकपूर्ती केली. त्याने 2005, 2006, 2007, 2009, 2010, 2012, 2013, 2018, 2019 आणि आता 2021मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.

राफेल नदालने एखादी स्पर्धा दहा किंवा अधिक वेळा जिंकली अशी ही पहिली-दुसरी नाही तर चौथी स्पर्धा आहे आणि एवढ्या स्पर्धा इतक्या वेळा जिंकणारा तो एकमेव खेळाडू आहे. इतर खेळाडूंमध्ये फक्त राॕजर फेडररलाच असे यश मिळवता आले आहे, मात्र त्याला केवळ दोनच स्पर्धा 10 वेळा जिंकता आल्या आहेत. नदालने मात्र चार स्पर्धांत असा पराक्रम केला आहे आणि त्यात फ्रेंच ओपनसारख्या ग्रँड स्लॕम स्पर्धेचा समावेश आहे.

एकाच स्पर्धेचे 10 पेक्षा अधिक वेळा विजेते

13- राफेल नदाल- फ्रेंच ओपन
12- राफेल नदाल- बार्सिलोना ओपन
11- राफेल नदाल- माँटे कार्लो मास्टर्स
10- राफेल नदाल- इटालियन ओपन
10- राॕजर फेडरर- हॕले ओपन
10- राॕजर फेडर- स्वीस इनडोअर, बाजेल

रोममधील या यशाबद्दल राफा’ने म्हटलेय की, 10 व्यांदा ही ट्रॉफी उंचावण्याची अनुभूती विलक्षण आहे. कल्पनेच्या पलीकडचे हे यश आहे. मी सुपर हॕपी आहे. माझ्या सहकाऱ्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. एवढ्या वर्षात लोकांचे फार फार प्रेम लाभले आहे त्यामुळे यंदा पुन्हा ही ट्राॕफी जिंकली तो अनुभव विलक्षण आहे.

नदाल- जोकोवीच ही टेनिस जगतातील सर्वात मोठी प्रतिस्पर्धा आहेत. त्यांच्यात तब्बल 57 लढती झाल्या असून त्यात जोकोवीचकडे 29-28 अशी निसटती आघाडी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button