नदाल व ओसोका ठरले लॉरियस पुरस्कारात सर्वोत्तम

Maharashtra Today

क्रीडा जगतात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्टस् (Award) अवार्डस 2021 (Laureus World Sports Awards 2021) वर टेनिसची छाप राहिली असून स्पेनचा राफेल नदाल (Rafael Nadal) व जपानची नाओमा ओसाका (Naomi Osaka) हे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराचे मानकरी (Laureus Sportsman of the year) ठरले आहेत.

नदालचा हा चौथा लॉरियस पुरस्कार आहे. त्याने याच्याआधी लक्षवेधी कामगिरी (breakthrough), पुनरागमन (comeback) आणि सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी (Player of the year) हा पुरस्कार जिंकलेला आहे. हे पुरस्कार एवढ्या वेळा जिंकणारा तो पहिलाच खेळाडू आहे.

त्याने गेल्यावर्षी 13 व्यांदा फ्रेंच ओपन जिंकताना रोजर फेडररच्या 20 ग्रँड स्लॅम विजेतेपदांची बरोबरी केली आहे.

जपानची नाओमी ओसाका हिने गेल्या वर्षी युएस ओपन स्पर्धा जिंकली पण त्यापेक्षाही अमेरिकेत कृष्णवर्णियांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात तिने ब्लॅक लाईव्हज मॅटर (Black lives Matter) या चळवळीत उठवलेला आवाज महत्त्वाचा ठरला.

फूटबॉलपटू मोहम्मद सालाह याला क्रीडा प्रेरणा ( Inspiration) पुरस्कार देण्यात आला.

आपल्या पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना नदालने म्हटलेय की, माझ्याप्रमाणेच इतरही खेळाडू कदाचित या पुरस्कारासाठी लायक होते पण हे माझे वर्ष होतै आणि यापेक्षा अधिक आनंद दुसरा असू शकत नाही. फ्रेंच ओपन जिंकून फेडररशी बरोबरी करणे हा अविस्मरणीय क्षण होता. माझा निकटचा प्रतिस्पर्धी व चांगला मित्र याची बरोबरी करता येणे ही खूप महात्त्वाची गोष्ट आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर आम्ही जो इतिहास घडवला तो पाहता हे खासच आहे.

या ऑनलाईन समारंभात आपली प्रतिक्रिया देताना नाओमी ओसाका म्हणाली की, कृष्णवर्णियांसाठीब्लॅक लाईव्हज मॅटर माध्यमातून आवाज उठविणे फार महत्त्वाचे होते. कारण माझ्यासाठी लोक काय म्हणतील असा विचार करुन मी बऱ्याचदा स्वतःला रोखले आहे परंतु जर तुम्हाला परिणामकारक व्यासपीठ मिळणार असेल तर तुम्ही त्याचा उपयोग करायलाच हवा.

सेव्हिल येथून ऑनलाईन पार पडलेल्या या समारंभात महान महिला टेनिसपटू बिली जीन किंग यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. फूटबॉलमधील आघाडीचा जर्मन संघ ‘बायर्न म्युनिक’ यांना वर्षातील सर्वोत्कृष्ट संघ जाहीर करण्यात आले. ब्रिटनचा फाॕर्म्युला वन रेसिंगपटू लुईस हॕमिल्टन (Lewis Hamilton) हा पहिल्या थलिट अॕडव्होकेट ऑफ द इयर ( Athlete Advocate of the Year Award) पुरस्काराचा मानकरी ठरला. त्यानेसुध्दा नाओमी ओसाकाप्रमाणेच वर्णद्वेषाविरुध्द आवाज उठवला होता.

2021 चे लॉरियस क्रीडा पुरस्कार विजेते…

*सर्वोत्कृष्ट खेळाडू- राफेल नदाल व नाओमी ओसाका
* सर्वोत्कृष्ट संघ- बायर्न म्युनिक
* लक्षवेधी कामगिरी – पॕट्रिक माहोमेस
* प्रभावी पुनरागमन- मॕक्स पॕरट
* स्पोर्ट फॉर गूड पुरस्कार- किक फाॕर मोअर (किकफेयर)
* अॕथलीट अॕडव्होकेट आॕफ दी इयर – लुईस हॕमिल्टन
*क्रीडा प्रेरणा पुरस्कार- मोहम्मद सालाह
*जीवन गौरव पुरस्कार – बीली जीन किंग
*वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रीडा क्षण – ख्रिस निकिक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button