नदालच्या र्कौतुकात फेडरर म्हणाला, ‘वेल डन, राफा! तू हक्कदार आहेस’

Rafael Nadal - Roger Federer

स्पेनच्या (Spain) राफेल नदाल (Rafel Nadal). अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपनचे (French Open) 13 व्यांदा अजिंक्यपद पटकावले आणि रॉजर फेडररच्या (Roger Federer) 20 ग्रँड स्लॅम अजिंक्यपदांच्या विक्रमाचीे बरोबरी केली. अंतिम सामन्यात नंबर वन नोव्हाक जोकोवीचसारख्या कसलेल्या आणि यंदाच्या अपराजित खेळाडूला सरळ सेटमध्ये पराभूत करत त्याने रोलँ गॅरोच्या लाल मातीवर आपल्याला तोड नाही हे पुन्हा एकदा सिध्द केले.

यानंतर लगेचच त्याने ज्याच्या विक्रमाची बरोबरी केली त्या मित्र व स्पर्धक रॉजर फेडररने सोशल मीडियावर नदालचे जाहीर र्कौतुक केले. नदालच्या कौतुकात फेडररने म्हटलेय की, मित्र राफा याच्याबद्दल एक व्यक्ती व एक विजेता म्हणून मला अतीव आदर आहे. बºयाच वर्षांपासून त्याची मला सर्वाधिक स्पर्धा आहे. आमच्या दोघांच्या स्पर्धेनेच आम्हाला अधिक चांगले खेळाडू बनवले आहे. त्यामुळे 20व्या ग्रँड स्लॅम अजिंक्यपदासाठी त्याचे अभिनंदन करणे हा माझ्यासाठी सन्मानच आहे. रोलँ गॅरोवर तो 13 वेळा अजिंक्य ठरलाय ही कामगिरी अद्भूत आहे. क्रीडाविश्वातील ती विलक्षण कर्तबगारी आहे. अशी कामगिरी कुणीच एकट्याने करू शकत नाही म्हणून त्याच्या चमूचेही मी अभिनंदन करतो. मला वाटते की 20 अजिंक्यपद हा आम्हा दोघांसाठीही पुढच्या प्रवासातील केवळ एक टप्पा आहे. वेल डन, राफा! तू या यशाचा हक्कदार आहेस.

ंआपला प्रतिस्पर्धी पण तेवढयाच चांगल्या मित्राकडून र्कौतुकाबद्दल नदाल म्हणाला की, रॉजर, तुझे धन्यवाद! आपली अतिशय चांगली र्मैत्री आहे आणि आपण एकमेकांचा आदर करतो. त्याचवेळी मला वाटते की मी जिंकत असताना त्याला आनंद होतो आणि त्याची चांगली कामगिरी झाली तर मला…

हे वर्ष फार कठीण होते आणि रोलँ गॅरोवर जिंकणे हे माझ्यासाठी सर्वस्व आहे. माझ्यासाठी रॉजरची बरोबरी किंवा कोणत्या विक्रमाची बरोबरी हे महत्त्वाचे नाही तर रोलँ गॅरोवरील यश महत्त्वाचे आहे.

तुमच्या शेजाºयाकडे अधिक मोठे घर, चांगली बोट किंवा चांगला फोन आहे म्हणून तुम्ही नेहमी इर्षा करू शकत नाही. याला अपवादही असतात. आमच्या दोघांची कारकिर्द संपेल तेंव्हा बघू की कोण कुठवर मजल मारलीय. आमची स्पर्धा असली तरी ती फार सुंदर स्पर्धा आहे. माझ्यासाठी 20 या संख्येसोबत फेडरर जुळलाय हे विशेष महत्त्वाचे आहे. आम्ही दोघेही खेळत राहणार आहोत. त्यामुळे पुढे आम्ही कुठपर्र्यत पोहोचणार हे सांगता येणे कठीण आहे.

सर्वाधिक ग्रँड स्लॅम स्पर्धांचा विजेता म्हणून मला कारकिर्दीचा शेवट करायला आवडेल हे लपवण्यात काहीच अर्थ नाही. विक्रमांकडे डोळा असतोच पण रॉजरसोबत मी या विक्रमात भागीदार आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER