नाडाने आरटीपीमध्ये समावेश क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचा घेतला सॅम्पल

Kl Rahul & Ravindra Jadeja

नाडाने त्यांच्या रजिस्टर्ड टेस्टिंग पूलमध्ये (RTP) प्रथमच समावेश असलेल्या क्रिकेटपटूंचा डोप नमुना घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी या क्रिकेटपटूंना डोप सॅम्पलिंगसाठी त्यांचा पत्ता (व्हेअर अबाउट्स) न पुरविल्याबद्दल नाडाने नोटीस बजावली होती. आयपीएल दरम्यान नाडाने आरटीपी क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांचे नमुने घेतले आहेत.

नाडाच्या आरटीपीमध्ये पाच क्रिकेटपटूंचा समावेश आहे

नाडाने दोन महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा यांच्याशिवाय रवींद्र जडेजा, केएल राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांना त्यांच्या आरटीपीमध्ये समाविष्ट केले आहे. त्यांना आरटीपीमध्ये समाविष्ट होऊन एक वर्ष झाले आहे, परंतु आजपर्यंत नाडा या क्रिकेटपटूंचा नमुना घेऊ शकले नाहीत. त्याचे मोठे कारण म्हणजे क्रिकेटपटूंकडून त्याच्या ठिकाणाचा पत्ता न देणे. यामुळे एप्रिल ते जून महिन्यांचा व्हेअर अबाउट् न भरल्याबद्दल नाडाने जूनमध्ये या क्रिकेटर्ससह ४१ खेळाडूंना नोटीस बजावली होती.

वर्षातून तीन वेळा नोटीस बजावून एखाद्या खेळाडूला मिस टेस्ट मानले जाते. यासाठी त्याला एक वर्षासाठी निर्बंधास सामोरे जावे लागू शकते. नमुना घेतला किंवा नसला तरी, खेळाडूला दर चार महिन्यांनी त्याचा पत्ता भरावा लागतो. वर्षभर या क्रिकेटपटूंचे नमुने न घेतल्यामुळे आयपीएलमध्ये या क्रिकेटपटूंचे नमुने घेण्याची संधी नाडाला मिळाली आहे. त्यांनी आयपीएलच्या नमुन्यांव्यतिरिक्त आरटीपी अंतर्गत या दोन्ही क्रिकेटपटूंचे नमुने घेतले.

आंतरराष्ट्रीय आरटीपीमध्ये समावेश असलेल्या क्रिकेटपटूंचे घेतले सॅम्पल

इतकेच नव्हे तर आयपीएलच्या दरम्यान आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय आरटीपीमध्ये सहभागी असलेल्या क्रिकेटपटूंचे नाडाने सॅम्पलदेखील घेतले आहेत. या क्रिकेटपटूंमध्ये देश-विदेशातील क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आयसीसीने त्यासाठी नाडालाच परवानगी दिली आहे. त्यानंतरच नाडाने आयसीसीच्या आरटीपीमध्ये समाविष्ट असलेल्या क्रिकेटपटूंचे नमुने घेतले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER