
दिल्ली : सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा यांचे नाव सरन्यायाधीश पदासाठी निश्चित केले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी एन.व्ही. रमणा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शरद बोबडे हे येत्या २३ एप्रिल रोजी निवृत्त होत आहेत. राष्ट्रपतींच्या मंजुरीचे पत्रदेखील न्यायालयाला पाठवण्यात आले.
भारताचे नवे सरन्यायाधीश कोण होणार, याची नेहमीच जनतेला उत्सुकता होती. मात्र, आता न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा हे नवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेले न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांचे नाव सरन्यायाधीश पदासाठी निश्चित झाले आहे. विद्यमान सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल याच महिन्यात संपत आहे. २३ एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे २४ एप्रिलपासून रमणा सरन्यायाधीशपदाचा कारभार सांभाळतील. देशाचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन.व्ही. रमणा यांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत शपथविधी पार पडणार आहे.
न्या. एन.व्ही. रमणा हे १७ फेब्रुवारी २०१४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले होते. त्यापूर्वी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. रमणा यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्रप्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नावरम गावात झाला. त्यांचे वडील शेतकरी होते. १० फेब्रुवारी १९८३ रोजी रमणा यांनी वकिलीस सुरुवात केली. आंध्रप्रदेशाशिवाय त्यांनी सेंट्रल अँड आंध्रप्रदेश प्रशासकीय ट्रिब्युनल्स, सर्वोच्च न्यायालयात दिवाणी, फौजदारी, सांविधानिक, कामगार, सेवा आणि निवडणुकीशी संबंधित प्रकरणे त्यांनी हाताळली आहेत.
Justice NV Ramana appointed as the next Chief Justice of India. pic.twitter.com/zsP9EG3fPR
— ANI (@ANI) April 6, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला