अहमदाबादच्या पार्कमध्ये दिसला रहस्यमय ‘मोनोलिथ’

Monolith

अहमदाबाद :-जगातील ३० शहरांत आढळलेला ‘मोनोलिथ’ (Monolith) (स्तंभ) भारतात अहमदाबादच्या (Ahmedabad) थलतेज परिसरातील ‘सिम्फनी पार्क’मध्ये आढळला ! हा पार्कमध्ये अचानक कसा आणि कुठून आला हे कोणालाही माहीत नाही. या स्तंभाला ‘मिस्ट्री मोनोलिथ’ही म्हणतात. हा स्टीलचा आहे. सहा  फुटांपेक्षा जास्त उंच आहे. तो जमिनीत गाडल्याची काहीही खूण दिसत नाही. हा अचानक आला कसा हे पार्कच्या माळ्यासह कोणालाही माहीत नाही. माळी आसाराम सांगतात की, मी एक वर्षापासून येथे काम करत आहे.

सायंकाळी काम करून घरी गेलो तेव्हा पार्कमध्ये हा स्तंभ नव्हता. दुसऱ्या दिवशी कामावर आलो  तेव्हा दिसला. रात्रीतून तो इथे कसा आला माहीत नाही. त्यांनी गार्डन मॅनेजरला याबाबत माहिती दिली. या स्टीलच्या त्रिकोणी स्तंभावर काही आकडे लिहिलेले आहेत. पार्कमध्ये येणारे लोक उत्सुकतेने हा स्तंभ पाहात आहेत. याच्यासोबत फोटो काढत आहेत. या स्टीलच्या मोनोलिथवर एकदम वर एक ‘सिम्बॉल’ही आहे. या मोनोलिथला अनेक लोक ‘मिस्ट्री स्टोन’ही म्हणतात. आतापर्यंत जगात ३० पेक्षा जास्त देशांमध्ये असे मोनोलिथ आढळले आहेत.

सर्वांत  आधी अमेरिकेच्या उटाहमध्ये मोनोलिथ आढळला होता. त्यानंतर रोमानिया, फ्रान्स, पोलंड, यूके आणि कोलंबियामध्येही आढळलेत. भारतात आढळलेला हा पहिलाच मोनोलिथ आहे. सर्व मोनोलिथ असे अचानक दिसलेत. ते आढळलेल्या ठिकाणी एवढे मोठे स्तंभ कसे आणि कुठून आलेत, याबद्दल अजून काहीच उलगडा झालेला नाही. याबाबत जगभरात वेगवेगळ्या थेअरीज आहेत. काही लोक हे एलियनचे काम असल्याचे सांगत आहेत.

अहमदाबादमध्ये ज्या पार्कमध्ये हा मोनोलिथ दिसला तो अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि ‘सिम्फनी’ कंपनीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये तयार केला आहे. हा मोनोलिथ कुठून आला याबद्दल कॉर्पोरेशनच्या अधिकार्‍यांना आणि सिम्फनी कंपनीच्या लोकांना काहीच माहिती नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER