‘माझी मुले राजकारणी नसून, शेकऱ्याची मुले आहेत’: नितीन गडकरी

Nitin Gadkari

अकोला: केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज काँग्रेसला टोला लगावताना म्हंटले की, “माझी मुले ही राजकारणी नसून, शेतकऱ्याची मुले आहेत”.

गांधीग्राम येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते बळीराजा जलसंजीवनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील ११ सिंचन प्रकल्पांच्या कामांचा प्रारंभ झाला. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, बाकीचे नेते आपल्या मुलांना राजकारणात आणण्याचा विचार करतात. मात्र, माझी मुले राजकारणात प्रवेश करणारा नाही. माझी मुले हे शेतकऱ्यांची मुले आहेत.

त्यामुळे मी आता ठरवले आहे की, आता शेतकरी, सोयाबीन, कापूस, गहू, तांदूळ लावणार नाही. तर शेतकरी पेट्रोल डिझेल लावेल. शेतातील सर्व प्रकारच्या कुटारपासून बायो इथॅनॉल, बायोसेट तयार करण्यात येईल. आता इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमचे पंप नाही तर शेतकऱ्यांचे पंप या देशात दिसतील असेही यावेळी गडकरी म्हणाले.