माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरू राहील; नवनीत राणा कडाडल्या

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती. आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, असे नवनीत राणा यांनी म्हटले. तसेच माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या. त्या दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. तसंच राणा यांना दोन लाख रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राणा यांची खासदारकीच धोक्यात येण्याची चिन्हं आहेत. त्यावरही राणा यांनी भाष्य केले.

या अमरावतीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते उत्साहाच्या भरात न्यायालयात गेले. आता मला भविष्यात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाकडून रद्द; खासदारकी धोक्यात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button