माझाही फोन टॅप केला होता; एकनाथ खडसेंच्या वक्तव्याने खळबळ

Eknath Khadse

जळगाव : सध्या राज्यात फोन टॅपिंगप्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) चांगलेच चर्चेत आहे. फोन टॅपिंगवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचाही फोन टॅप करण्यात आल्याची माहीती त्यांनी दिली आहे.

…तेव्हापासून माझा फोन टॅप केला : एकनाथ खडसे
मंत्रिमंडळामधून मला राजीनामा द्यायला लावला, तेव्हापासून माझा फोन टॅप केला जातो, असा मला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले होते. दिल्ली विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना मी tv9 ला फोन टॅप करत असल्याची माहीती दिली होती. तेव्हापासून माझी तक्रार आहे. त्यावेळेस माझ्या तक्रारीनंतर ॲडिशनल चीफ सेक्रेटरीनी चौकशी केली होती. मला शंका आहे की माझा फोन टॅप होत आहे, असे जाणवत होते. त्यामुळे तथ्य काय आहे, हे मी सरकारला पत्राद्वारे विनंती करणार आहे, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.

या सगळ्याची माहीती फडणवीसांच्या हाती
फोन टॅपिंगच्या माध्यमातून राज्यातील काही नेते, पोलीस अधिकारी आणि इतर व्यक्तींची संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. या सगळ्याची इत्यंभूत माहीती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती लागली होती. हा डेटाबॉम्ब घेऊन फडणवीस केंद्रीय गृहसचिवांकडे गेले. तसेच याप्रकरणात केंद्रीय यंत्रणेकडून चौकशी व्हावी, असा आग्रह आता भाजपने धरला आहे. आता ठाकरे सरकारने प्रत्येक पाऊल जपून टाकायचे ठरवले आहे.

‘तो अहवाल आव्हाड आणि मलिकांनी तयार केला असावा’
“फोन टॅपिंग प्रकरणाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना सोपवण्यात आलेला अहवाल हा राज्याचे मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांनी तयार केलाच नसेल, असा दावा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केला. मी सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते अत्यंत साधे आणि सरळमार्गी अधिकारी आहेत. त्यामुळे हा अहवाल त्यांनी तयार केलाच नाही. तर जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हा अहवाल तयार केला असावा आणि सीताराम कुंटे यांना त्यावर केवळ सही करायला लावली असेल.” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER