‘माझा मोबाईल, माझी जबाबदारी’, महापौर पेडणेकरांच्या ट्विटवरून मनसेचा टोला

Sandeep Deshpande - kishori pednekar - Maharashtra Today

मुंबई :- पेडणेकर सोशलवर चांगल्याच ट्रोल होत आहेत. त्यांच्या ट्विटमुळे त्या चांगल्याच वादात अडकल्या आहेत. मुंबई महापालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरबाबत नेटकऱ्याने प्रश्न विचारला असता किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी आक्षेपार्ह शब्दात उत्तर दिले. किशोरी पेडणेकर यांनी ट्विटरवर लसीकरणाच्या टेंडरबाबत मुलाखतीचा व्हिडीओ शेअर केला होता.

यावर एका नेटकऱ्याने कंत्राट कोणाला दिले? असा प्रश्न विचारला होता. यावर किशोरी पेडणेकर यांनी उत्तर देताना ‘तुझ्या बापाला’ असं म्हटलं. त्यावर आता मनसेचे (MNS) पदाधिकारी संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पेडणेकरांना जोरदार टोला लगावला. पेडणेकरांच्या ट्विटवरून संदीप देशपांडे यांनी जोरदार टोला हाणलाय. ‘आलं अंगावर. ढकललं कार्यकर्त्यांवर. यापुढे माझा मोबाईल, माझी जबाबदारी’ असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. दरम्यान, महापौर पेडणेकर यांनी आक्षेपार्ह ट्विटवर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘माझ्या मोबाईलवरून एका कार्यकर्त्यानं ते ट्विट केलं होतं. तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचंच होतं. त्याची मी हकालपट्टी केली आहे.’ असे स्पष्टीकरण पेडणेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button