काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे हाच माझा मुख्य उद्देश- चंद्रकांत पाटील

Chandrakant patil Congress

मुंबई : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करणे आणि राज्यातील युतीच्या सर्व २८८ उमेदवारांसाठी काम करणे हाच मुख्य उद्देश आहे , असे सांगत राज्याचे महसूलमंत्री आणि भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या योजनांबाबत भाष्य केले . ‘कॉंग्रेसमुक्त महाराष्ट्र’ हेच भाजपचे ध्येय आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने कंबर कसली आहे . तसेच विधानसभा निवडणूक जवळ आली असल्याने युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून आणण्यासाठी भाजपबरोबरच शिवसेना व मित्रपक्षाच्या उमेदवारांसाठी काम करायचे आहे . त्यासाठी सर्व २८८ मतदारसंघांत भाजप कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे, असे आवाहनही त्यांनी केले .

लोकसभा निवडणूकदरम्यान बारामतीत भाजपचाच उमेदवार निवडणून येणार, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला होता . मात्र या मतदारसंघातून सुप्रिया सुळे मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या.

हे पाहता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांचा पराभव करणे आवश्यक आहे. मात्र आम्ही २०२४ मध्ये नक्की विजय मिळवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चंद्रकांत पाटील यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे .