‘लहान माझी बाहुली तिची मोठी सावली !’ पंकजाकडून प्रीतम मुंडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

my-little-doll-is-her-big-shadow-happy-birthday-to-pritam-mude-from-pankaj

बीड :- भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त विविध क्षेत्रांमधून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या खास दिवशी त्यांची बहीण  तथा भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankja Munde) यांनीही प्रीतम यांना खास शुभेच्छा दिल्या.

लहान माझी बाहुली तिची मोठी सावली… इतकी एकरूप की जणू सावली… वाढदिवसाचे खूप आशीर्वाद, प्रीतम तू नेहमी सुखी रहा.” अशा सदिच्छा पंकजा यांनी दिल्या.

बीडच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा १७ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेतले जातात. तसेच मोठ्या उत्साहात खा.मुंडे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. यानिमित्त मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माझा वाढदिवस साजरा करू नका, असे आवाहन मुंडे यांनी सोशल मीडियाद्वारे केले आहे. याबाबत त्यांनी एक फेसबूक पोस्ट लिहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER