‘माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर’

'माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर'

कोल्हापूर : ‘माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर’ चळवळीला आजपासून सुरुवात झाली. ताराराणी चौकातून सुरुवात करण्यात आली. हातात फलक घेऊन मोहिमेच्या कार्यकर्त्यांनी थुंकीमुक्त कोल्हापूर करण्याचा संदेश दिला. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना नागरिकांना जाब विचारात त्यांनाच ती थुंकी पुसण्यास लावली.

शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यासाठी आणि रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आता कोल्हापूरकरांनीही (Kolhapur) आपले योगदान देण्याचे ठरवले आहे. ‘एक दिल एक जान, देऊ स्वच्छतेकडे ध्यान’, ‘एक पिचकारी आयुष्याचा नाश करी’ असे पोस्टर हातात घेऊन जनजागृती करण्यात आली. करवीरनगरीपासून सुरू होणारी ही मोहीम यापुढे शहराच्या सर्व भागात व पूर्ण जिल्ह्यात राबवण्याचा मनोदय कोल्हापूरकरांनी केला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा एक दंडनीय गुन्हा आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या लोकांवर चाप लावण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल, असा विश्वास सामाजिक कार्यकर्त्या दीपा शिप्पूरकर यांनी व्यक्त केला. मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभाग नोंदवून कोल्हापूरला स्वच्छ आणि सुंदर बनवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER