माझं कोल्हापूर माझा रोजगार उपक्रमाला प्रतिसाद

माझं कोल्हापूर माझा रोजगार

कोल्हापूर : कोल्हापुरातील परप्रांतिय मजूर आपल्या गावी परत गेल्याने फाउंड्री, कारखाने, बांधकाम, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारांची गरज भासत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी सुरू केलेल्या माझं कोल्हापूर माझा रोजगार या उपक्रमाला पहिल्या दिवशी रविवारी १७१९ अर्ज आले. ना. सतेज पाटलांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोरोनामुळे बंद असलेल उद्योग आता सुरू होत असले तरी कामगारांचा मोठा तुटवडा आहे. यापार्श्वभूमीवर भूमीपुत्रांना रोजगाराची संधी मिळावी, उद्योजकांपुढील कामगारांचा प्रश्न मिठावा या उद्देशाने माझं कोल्हपूर माझा रोजगार ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरातील उद्योजकांशी कामगार उपलब्धतेबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे संवाद साधून उपक्रमाची माहिती दिली. यानंतर करिअर ॲट मिशन रोजगार या वेबसाईटवर तसेच वॉटस्‌ ॲपवर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

जून महिन्यात इचलकरंजी आणि कोल्हापुरात जॉब फेअर घेण्यात येणार आहे. दरम्यान या उपक्रमाला बेरोजगार तरुण-तरुणींचा मोठा प्रतिसाद मिळत असून ईमेलवर १२४९ तर व्हॉट्सॲप वर ४७० अर्ज आले. परप्रांतीय कामगार त्यांचा गावी गेल्याने स्थानिक लोकांना रोजगाराचा अनेक संधी असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER