माझ्या गुरूंनी मला शिकवले, ‘कोणासमोर कधीही झुकणार नाही’- पंकजा मुंडे

My Guru taught me I will never bow down to anyone - Pankaja Munde

बीड : आज गुरुपौर्णिमेचा दिवस. आपल्या भारतीय संस्कृतीत आईवडिलांनंतर गुरूला विशेष स्थान देण्यात आले आहे. गुरूकडून आपल्याला मिळणाऱ्या विद्येबद्दल गुरूची पूजा करणे, या दिवशी अपेक्षित असते. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील त्यांच्या गुरूचं स्मरण केलं आहे. पंकजा मुंडे यांचे गुरू म्हणजे त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे.

ज्यांचं बोट धरून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आज त्यांची उणीव त्यांना भासते आहे. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांनी ट्विट करून गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे.

माझे गुरू विचारांनी माझ्या पाठीशी आहेत, त्यांच्या नसण्याची कमी नेहमीच राहील. गुरूच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे कठीणच असते. माझ्या गुरूंनी मला शिकवले, “थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही. ” तसं वागण्याचा प्रयत्न करत राहीन, असं त्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER