… माझे सरकार, माझी स्थगिती; अन् रोज फजिती! भाजपाचा उद्धव ठाकरेना टोमणा

Shivrai Kulkarni & Uddhav Thackeray

कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिले. उद्धव ठाकरे सरकारसाठी हा मोठा दणका आहे. यावर भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivrai Kulkarni) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना, … माझे सरकार, माझी स्थगिती; अन् रोज फजिती! असा झोम्बणारा टोमणा मारला.

मुंबई उच्च न्यायालयाने ‘एमएमआरडीए’ला काम थांबवण्याचे आदेश दिले असून भूखंड ‘जैसे थे’ ठेवण्यास सांगितले. जागेच्या हस्तांतरणालाही स्थगिती दिली. या निर्णयानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर टीका होते आहे.

ही बातमी पण वाचा : थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड, भातखळकरांची उद्धव ठाकरेंवर पुन्हा टीका

भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी उद्धव ठाकरे यांची विविध विषयांवरून एकाच ट्विटमध्ये टिंगल केली – “माझा पेपर, माझी मुलाखत… इतरांची कशाला आफत? Facebook Live वर माझी बांग… मेरे बाप की एकही टांग! माझे सरकार, माझी स्थगिती… रोज कोर्टाचा बांबू आणि रोज फजिती !!!”,

भाजपाचे दुसरे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणालेत, उद्धव ठाकरे सरकारचे वैशिट्य काय? देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना स्थगिती देणे. अशा सरकारने घेतलेल्या मनमानी निर्णयांची कोर्टाकडून फजिती होते.

कांजूरमार्ग कारशेड स्थगिती मुद्द्यावरून भाजपाच्या अनेक नेत्यांनी भाष्य केले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या मुद्द्यावर ठाकरे सरकारला सल्ला दिला. “विकासकामांमध्ये हार – जीत करू नये. मुंबईच्या विकासासाठी काम केले पाहिजे. मेट्रोच्या कामासाठी लागणारा पैसा जनतेचा, सर्वांचाच आहे. कारशेडचे काम त्वरित सुरू न केल्यास प्रकल्प २०२४ पर्यंत लांबेल. अशा परिस्थितीत राज्य सरकारचा त्याच जागेसाठी अटट्हास का आहे? या कामात जेवढा उशीर होईल तितके नुकसान होईल. गेले वर्षभर हे काम रखडले आहे. आता आरेमध्ये तत्काळ कारशेडचे काम सुरू करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER