वडिलांनी माझ्यासाठी कधीही चित्रपट बनवला नाही – अभिषेक बच्चन

Abhishek Bachchan

अमिताभच्या (Amitabh Bachchan) सोबत काम करणाऱ्या अनेक नायकांनी त्यांच्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मिती केली होती. धर्मेंद्रने (Dharmendra) सनी (Sunny Deol) आणि बॉबीसाठी (Bobby Deol) तर फिरोज खानने (Firoz Khan) फरदीनसाठी (Fardeen Khan), विनोद खन्नाने अक्षय खन्नासाठी, जितेंद्रने तुषार कपूरसाठी चित्रपट निर्माण केले होते. याशिवायही अगदी राजेंद्र कुमार, शशी कपूरपासून मनोज कुमारपर्यंतही अनेकांनी आपल्या मुलांसाठी चित्रपट निर्मिती केली होती. परंतु अमिताभ बच्चन यांनी मात्र कधीही अभिषेकसाठी (Abhishek Bachchan) चित्रपटाची निर्मिती केली नाही. त्यातच अमिताभ सुपरस्टार असल्याने पित्याच्या या इमेजखाली अभिषेक कायमच दबलेला राहिला. 2000 मध्ये रिफ्यूजी चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर आगमन केले. परंतु त्याला कधीही प्रचंड असे यश मिळालेच नाही.

बॉलिवूडमधील (Bollywood) नेपोटिझमच्या विषयावर प्रथमच मत व्यक्त करताना अभिषेक बच्चनने म्हटले की, येथे नेपोटिझम चालत नाही. तुमची कारकिर्द ही संपूर्णपणे प्रेक्षकांवर अवलंबून असते. तुमचे काम आवडले तर ते त्याची प्रशंसा करतात. आवडले नाही तर चित्रपट फ्लॉप होतो. आणि यावरच तुमचे करिअर अवलंबून असते. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कधीही चित्रपट तयार केला नाही. पण मी मात्र त्यांच्यासाठी एका चित्रपटाची अमिताभ बच्चन आणि विद्या बालन अभिनीत चित्रपट ‘पा’ चीनिर्मिती केली होती. मीसुद्धा यात काम केले होते आणि मी त्यांचा बप झालो होतो. जर माझ्या वडिलांचा माझ्यावर हात असता तर मी अनेक चित्रपटांमध्ये दिसलो असतो. पण चित्रपट हा व्यवसाय आहे. आणि येथे कोणीही पैसे घालवण्यासाठी येत नाही. जे कलाकार चालतात त्यांना घेऊनच चित्रपट तयार केले जातात असेही अभिषेकने म्हटले.

माझे चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर मला अनेक चित्रपटांमधून काढण्यात आले तर काही चित्रपटांची घोषणा झाली असतानाही ते डब्यात बंद करण्यात आले. ते कोणते चित्रपट आहेत ते मला चांगले ठाऊक आहे. पण मी त्यांना दोष देत नाही असेही अभिषेकने स्पष्ट केले. अभिषेक सध्या शाहरुख खान द्वारा निर्मित ‘बॉब बिस्वास’ आणि अजय देवगन द्वारा निर्मित ‘द बिग बुल’मध्ये काम करीत असून या दोन्ही चित्रपटांचे शूटिंग बाकी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER