‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियानातही राजकारण : तक्रार

माझे कुटुंब, माझी जबाबदारी

मुंबई : महानगरपालिकेच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २४ लाख लोकांचा समावेश असलेल्या सात लाख घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे.

या मोहिमेमुळे केवळ बीएमसीचे आरोग्य अधिकारीच नाही, स्थानिक राजकारणीसुद्धा खूश आहेत; कारण यामुळे राजकीय लोकांना त्यांच्या मतदारसंघात फिरता येत आहे. आपल्या भागातील नागरिकांच्या आरोग्याविषयी जाणून घेता येत आहे. याचा त्यांना निवडणुकीत फायदा होऊ शकणार असल्याने स्थानिक नेते या मोहिमेवर विशेष खूश आहेत.

महापालिकेने स्थानिक नगरसेवकांच्या मदतीने वसाहती आणि झोपडपट्ट्यांविषयी माहिती घेतली. ती आरोग्य अधिका-यांना दिली. यामुळे महापालिकेला सर्वेक्षण करणे सोयीचे होत आहे.

तर दुसरीकडे या मोहिमेअंतर्गतही राजकारण होत असल्याची एक बाब समोर आली आहे.

काही नगरसेवकांनी सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या (Shiv Sena) प्रभागात अधिक प्रभावीपणे काम केल्याची तक्रार केली असता महापालिकेच्या अधिका-यांनी हा आरोप फेटाळून लावला आणि गरज भासल्यास स्थानिक आमदार किंवा नगरसेवकांची मदत घेत असल्याचे सांगितले.

१५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान कोविडच्या लक्षणांकरिता १.४ कोटी लोकांची तपासणी करण्यासाठी पालिकेची सुमारे ३५ लाख घरांचे सर्वेक्षण करण्याची योजना आहे. “भविष्यातील नियोजन आणि संदर्भांसाठी आरोग्याचा तपशील गोळा करण्याचा विचार आहे.” अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिका-याने दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER