माझं शिक्षण माझं उपक्रमाबरोबरच आदर्श शाळा : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

Varsha Gaikwad

कोल्हापूर : कोरोना काळात शाळा बंद असतानाही शिक्षण मात्र सुरु होते. शिक्षण विभाग क्षिणाच्या माध्यमातून देशाचे भविष्य आणि राष्ट्राची संपत्ती घडवत आहे. ‘माझं शिक्षण मांझ’ भविष्य या उपक्रमाबरोबर आदर्श शाळाही ( ideal school) संकल्पना शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणार असल्याचे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी आज दिले.

जिल्हा परिषदेच्या कणेरीवाडी येथील विद्या मंदिरात डिजिटल शाळेचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री श्रीमती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी पालकमत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, खासदार संजय मंडलीक, जि.प. अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.

शिक्षणमंत्री गायकवाड म्हणाल्या कणेरवाडीच्या शाळेच्या चालत्या-बोलत्या भिंतीचा शिकवण देण्यासाठी आहेत. आता यापुढे कणेरावाडीचे नाव राज्यात घ्यावे लागेल शिक्षण आणि विद्यार्थ्यांनी राज्याचे नाव जगाच्या पातळीवर माठे करण्याचे काम केले आहे.शाळामधील गुणवत्ता पुढे कशी घेवून जायची हे आपलं पुढील धोरण आहे.

खा. मंडलीक म्हणाले, कारोना सारख्या संकटाचे संधीत रुपांतर कसे करायचे ते कणेरीवाडीने दाखवून दिले आहे. लोकवर्गणीतून शाळेचे रुप पालटलं आहे. हे देशात पहिले आदर्शवत काम असेल.

आ. ऋतुराज पाटील म्हणाले, 30 लाखाच्या लोक वर्गणीतून अभिमानास्पद काम कणेरावाडीने केले आहे. जिल्हा परिषदची आदर्श शाळा म्हणून या शाळेची ओळख होईल रोल मॉडेल म्हणून ही शाळा उदयास येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER