देशाच्या विकासात योगदान देता येते हे माझे भाग्य, ‘भारतरत्न’ची मोहीम थांबवा – रतन टाटा

Ratan Tata-Bharat Ratna

मुंबई : टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपतीच नाहीत तर मोठ्या मनाचे व्यक्ती आहेत. सोशल मीडियावर रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या, अशी शुक्रवारी ‘मोटिवेशनल स्पीकर’ डॉ. विवेक बिंद्रा (Vivek Bindra) यांनी ट्विटवरून केली. त्यानंतर #BharatRatnaForRatanTata हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला.

लोकांचे प्रेम पाहून भारावलेल्या रतन टाटा (Ratan Tata) यांनी शनिवारी ट्विट करून यासाठी सर्वांचे आभार मानत हि मोहीम थांबवण्याचे आवाहन केले! त्यांनी लिहिले की,”मला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी सोशल मीडियावरून तुम्ही दाखवलेल्या भावनांचा मी आदर करतो. पण, मी एक विनंती करू इच्छितो की ही मोहीम थांबवा. भारतीय असल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. देशाच्या प्रगती व समृद्धीसाठी मी माझे प्रयत्न व योगदान देत राहीन.”

दरम्यान, डॉ. विवेक बिंद्रा यांनी मोहिमेत सर्वांनी भाग घ्यावा, असे आवाहन केलं आहे.

रतन टाटा यांच्यावर कोट्यवधी भारतीय प्रेम करतात. टाटा हे देखील भारतावर आणि भारतीयांवर प्रेम करतात. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांची कुटुंबाप्रमाणे काळजी करतात. कोरोना साथीच्या काळात टाटा यांच्या या दानशूर स्वभावाचा देशावासीयांनी अनुभव घेतला आहे. कोरोना काळात टाटा कंपनीने लॉकडाऊनमध्येही कर्मचाऱ्यांना पगार तर दिला, दिवाळी बोनसही जाहीर केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER