तुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी ; रिपोर्ट आला निगेटिव्ह

Tukaram Mundhe

मुंबई : नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदावरुन मुंबईमध्ये बदली झालेल्या तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांनी कोरोनावर (Corona) यशस्वी मात केली आहे . यासंदर्भात स्वतः मुंढे यांनी ट्विटरवरून माहिती दिली .

“माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. कोरोनाचा लढा हा सकारात्मक विचार आणि कृतीतून लढता येतो. सशक्त इच्छाशक्ती, केंद्रीत लक्ष आणि संयुक्त प्रयत्नांची त्याला जोड आवश्यक आहे,” असे ट्विट तुकाराम मुंढेंनी केले आहे.

दरम्यान तुकाराम मुंढेंना 25 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर 12 दिवसांनी तुकाराम मुंढेंचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मुंढे यांनी ट्विट करत कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली होती. “मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमामे मी स्वत:ला अलगीकरण (आयसोलेट) केलं आहे. मागील १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करावी अशी विनंती आहे. तसेच नागपूरमधील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मी घरुन काम करणार आहे. आपण लवकरच ही लढाई जिंकू,” अशा शब्दांमध्ये त्यांनी कोरोनावर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER