मराठा आरक्षणासाठी माझा महाविकास आघाडीवर संपूर्ण विश्वास – रोहित पवार

Rohit Pawar - Mahavikas Aghadi

अहमदनगर : दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा निर्णय देत मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला धक्का बसला. मराठा आरक्षण टिकवून ठेवण्यात आघाडी सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही विरोधकांकडून होत आहे. मात्र असे असतानाही महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून आपली बाजू हिरिरीनं मांडली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याबद्दल बोलताना महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे.

मराठा आरक्षण व केंद्र सरकारने खुल्या वर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी दिलेलं १० टक्के आरक्षण हे दोन्ही प्रकरणं सर्वोच्च न्यायालयानं घटनापीठाकडं सोपवलं; पण तसं करताना फक्त मराठा आरक्षणालाच स्थगिती दिली, हे धक्कादायक आहे. तरी महाविकास आघाडी सरकार व न्यायालयावर आपला पूर्ण विश्वास आहे, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

सरकारही पूर्ण प्रयत्न करत असल्याचं मी पाहतोय. तसंच आरक्षण कायमस्वरूपी टिकवण्यासाठी घटनापीठाकडं पाठवण्याची मागणीही आपणच केली होती. लाखो युवांच्या भावनेचा व भविष्याचा हा प्रश्न असून अंतिम निकाल हा आरक्षणाच्याच बाजूने लागेल,असा विश्वास आहे. यात कुणीही राजकारण करू नये, असेही रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER