माझ्या मिशीला कोणाचेही खरखटे लागलेले नाही : माजी खासदार राजू शेट्टी.

सांगली :- माझ्या मिशीला मी आजपर्यंत कोणाचेही खरकटे लावून घेतले नसल्याने माझ्या जिभेची धार कायम आहे. ज्यावेळी धार संपेल त्याचवेळी मी थांबणार आहे. अद्यापही काही धोरणांची निश्चिती करणे बाकी असल्याने आपला लढा सुरुच राहणार आहे. त्यासाठी मला पुन्हा 2024 च्या लोकसभेत जायचे आहे, असा आत्मविश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक‘वारी सांगलीत व्यक्त केली.

राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्या वतीने शुक‘वारी माजी खासदार शेट्टी यांना नेमगोंडा दादा पाटील जनसेवा पुरस्काराने तर नाशिक जिल्ह्यातील कृषी उद्योजक विलास शिंदे यांना राजमती नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रवणबेळगोळचे स्वस्तिश्री चारुकिर्ती महास्वामीजी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा झाला. यावेळी ट्रस्टचे मानद सचिव सुरेश पाटील, जयश्री पाटील, सुदर्शन पाटील उपस्थित होते. शिंदे यांच्यातर्फे कंपनीचे व्यवस्थापक मंगेश भास्कर यांनी पुरस्कार स्विकारला. या कार्यक‘मादरम्यान राजतमी भवनच्या वातानुकुलित विभागाचे उद्‌घाटन झाले.

शेट्टी म्हणाले, केवळ रस्त्यावर संघर्ष करून शेतमालाला दर मिळत नाही, तर त्यासाठी लढ्याला धोरणात बदलावे लागते. ते काम दि‘ीत जावून करणे मला शक्य झाले. मग तो उसाचा दर असो किंवा दूधाचा दर. विधानसभेत आणि लोकसभेत एका सदस्याची ताकद काय असते, हे मी दाखवू शकलो. कारण या दोन्ही ठिकाणी कोणतेही धोरण ठरवताना ते शेतकर्‍यांपेक्षा व्यापारी आणि दलालांचे हिताचे कसे असेल, यावर भर दिला जातो. 62 टक्के शेतकर्‍यांचे अर्थकारण स्थिर व्हावे, असे कोणालाच वाटत नाही. ते व्हावे म्हणून माझा लढा सुरुच राहणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणांवर ह‘ा चढवताना शेट्टी म्हणाले, केंद्रातील सरकार महात्मा गांधीजींचे विचार सोयीपुरते वापरत आहे. गांधीची म्हणाले होते, शेतकरी सुखी झाला तर देश सुखी होईल. गरिबी हटवण्यासाठी सरकारने काही करण्याची गरज नाही, केवळ गरिबांच्या छाताडावरून सरकारने उठावे, तो स्वतः गरिबी दूर करेल.

चारुकिर्तीजी महास्वामी यांनी शेतकर्‍याच्या हितासाठी झटणार्‍या माणसांचा गौरव हा देशाच्या कृषी क्षेत्राचा गौरव असल्याचे सांगितले. सुरेश पाटील यांनी स्वागत केले. यानिमित्ताने राजगोंडा पाटील, िअवनाश पाटील आणि दीपक पाटील यांचाही गौरव करण्यात आला.