
पुणे : महात्मा ज्योतिबा फुले (Mahatma Jyotiba Phule) व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या पुण्यातील फुले वाड्याचा सर्वांगीण विकास करून या ऐतिहासिक वाड्याला जतन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मुंडे यांनी पुण्यातील फुले वाडा येथे जाऊन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मुंडे यांनी अधिकाऱ्यांसह संपूर्ण वाड्याची पाहणी केली, यावेळी राज्य सरकारच्या वतीने फुले वाड्यात ज्या – ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या पुरवून या ऐतिहासिक स्थळाचा पुनर्विकास केला जाईल असेही म्हटले आहे. पुण्यातील ऐतिहासिक फुले वाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई व महात्मा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्य वेचले.पहिला महिला शिक्षण दिन या महान कार्यास समर्पित असेही मुंडे म्हणाले आहेत.
पुण्यातील ऐतिहासिक फुले वाडा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई व महात्मा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले. स्त्री शिक्षणासाठी पुढाकार घेत त्यांच्या शिक्षण व सक्षमीकरणासाठी त्यांनी आयुष्य वेचले.पहिला महिला शिक्षण दिन या महान कार्यास समर्पित. pic.twitter.com/ncorK3VmQv
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 3, 2021
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला