म्युच्युअल फंड : जुलै ते ऑगस्ट दरम्यान स्टॉक मार्केटमधून काढले १७,६०० कोटी रुपये

Mutual Funds

म्युच्युअल फंड कंपन्यांनी (Mutual Fund) जुलै ते ऑगस्ट दरम्यान स्टॉक मार्केटमधून १७,६०० कोटी रुपये काढले. इक्विटी-आधारित योजनांमधील नकारात्मक प्रवाहामुळे म्युच्युअल फंडांनी ही रक्कम काढली आहे. कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) आर्थिक उलाढालीचा वेग मंदावला आहे आणि शेअर बाजारामध्ये (Share Bazaar) चढ-उतार होण्याची शक्यता आहे, त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांनी स्टॉक मार्केटमधून (Stock Market) माघार घेतली आहे.

भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड (SEBI) च्या आकडेवारीनुसार, जानेवारी ते जून या कालावधीत म्युच्युअल फंड कंपन्यांनी शेअर्समध्ये ३९,७५५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली. सेबीची रजिस्टर्ड पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी ग्रीन पोर्टफोलिओचे सह-संस्थापक दिवम शर्मा म्हणाले की,’म्युच्युअल फंडाचे नूतनीकरण हे गेल्या दोन महिन्यांतील इक्विटी म्युच्युअल फंड योजनांमध्ये नकारात्मक प्रवाह आणण्याचे कारण आहे.’

‘नुकत्याच बाजारात झालेल्या तेजीनंतर काही गुंतवणूकदार सावध आहेत, तर काहींनी थेट शेअर्स मध्ये पैसे गुंतवले आहेत. गेल्या काही महिन्यांत डिमॅट खात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.’ असे ते म्हणाले.

म्युच्युअल फंडाशी संबंधित नियम बदलले

सेबीने म्युच्युअल फंडांच्या मिडकॅपसाठी नवीन नियम घोषित केले आहेत. मल्टीकॅप फंडाला एकूण बाजारपेठेत ७५ टक्के गुंतवणूक करावी लागेल. आतापर्यंत ही मर्यादा ६५ टक्के होती. तसेच, या ७५ टक्के रकमेपैकी २५ टक्के शेअर्स मध्ये गुंतवणूक करावी लागेल. त्याचबरोबर २५ टक्के मिडकॅप आणि २५ टक्के स्मॉलकॅप शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाईल. या निर्णयाचा शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा होईल. हे नवीन नियम जानेवारी २०२१ पासून लागू होतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER