मटणाचे जेवण अन् संत तुकोबांचे गुणगान : वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

मटणाचं जेवण अन संत तुकोबांचे गुणगान ; वारकऱ्यांमध्ये संतापाची लाट

मुंबई :- मटणावर यथेच्छ ताव मारल्यानंतर लगेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे जीवनकार्य विशद करणारा एखादा कार्यक्रम आयोजित करावा याला आयोजकांच्या बुद्धीचे दिवाळे निघाले म्हणावे नाही तर काय? असा संतापजनक सवाल सध्या वारकऱ्यांकडून केला जात आहे.

कोथरूड पुणे येथील चांदणी लॉन्समध्ये वशाटोत्सवाचे (Vashatotsav) आयोजन २० फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. वशाट म्हणजे शाकाहाराच्या विरुद्ध म्हणजेच मांसाहार करणे. आपल्या पुरोगामित्वाचे प्रदर्शन करण्यासाठी अशा वशाटोत्सवाचे आयोजन केले जाते. कोणी शाकाहार करावा, कोणी मांसाहार करावा याचे कोणतेही बंधन नाही. मात्र मांसाहाराचा संबंध संत तुकोबांशी यानिमित्ताने आयोजकांनी जोडल्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियातून उमटत आहेत.

राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), काँग्रेसचे (Congress) मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), शिवसेनेचे (Shiv Sena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) या उत्सवात मार्गदर्शन करणार आहेत.  काही पुरोगामी पत्रकारही विविध विषयांवर उदबोधन करणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार विचारवंत ज्ञानेश महाराव तसेच सहकार्‍यांच्या भूमिकेने सजलेले संगीत नाटक हे मांसाहारी भोजनानंतर लगेच सादर होणार असल्याने वारकरी वर्गामध्ये त्याबाबत चीड व्यक्त करण्यात येत आहे. फेसबुकवर त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने की काय आता संगीत नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांवरील अत्यंत उदबोधक असा हा संगीत नाटक प्रयोग रद्द करण्याऐवजी आयोजकांनी मांसाहार या ठिकाणी केला जाणार नाही, असे जाहीर केले असते तर त्यांनी वारकरी संप्रदायाच्या भावनांची बुज राखली असा त्याचा अर्थ झाला असता; पण तथाकथित पुरोगाम्यांनी संगीत नाटकाचा प्रयोग रद्द केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER