मुथय्या मुरलीधरन यांनी सांगितले तामिळनाडूमध्ये का होत आहे त्याच्या बायोपिक ‘८००’ ला विरोध

Muttiah Muralitharan - Vijay Sethupathi - 800

डार मोशन पिक्चर्सने एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध करत सांगितले कि फिल्म ८०० पूर्णपणे स्पोर्ट्स बयोग्राफी आहे, त्यामध्ये कोणतेही राजकीय विधान नाही.

श्रीलंकेचा (Srilanka) माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) चा गोलंदाजी प्रशिक्षक मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) म्हणाला आहे की त्याच्या आयुष्यावर प्रस्तावित बायोपिक ‘८००’ हे केवळ त्याच्या क्रीडा कामगिरीबद्दल आहे आणि त्याने देशात अनेक दशके संघर्ष करूनही हे केले. आपल्यावर तामिळ लोकांच्या विरोधात असल्याचा आरोप होत असल्याचे त्याने नाराजी व्यक्त केली आहे आणि म्हणाला की हे राजकीय कारणांमुळे आणि अज्ञानामुळे होते आहे.

तमिळनाडूचा (Tamil Nadu) अभिनेता विजय सेतुपति (Vijay Sethupathi) बायोपिकच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला पुन्हा सुरुवात करत आहे. गुरुवारी काही राजकीय पक्षांनी असा आरोप केला आहे की मुरलीधरनने तामिळांचा विश्वासघात केला आहे, त्यामुळे सेतुपतींनी यात काम करू नये.

मुरलीधरन म्हणाला की निरपराध लोकांच्या हत्येचे त्याने कधीही समर्थन केले नाही. त्याने निवेदन जारी करत म्हणाला कि श्रीलंकेच्या गृहयुद्धातील वेदना त्याला समजते आणि त्याच्या कुटुंबाने श्रीलंकेची आपली यात्रा ‘कुली’ म्हणून केली होती तो म्हणाला, ‘आम्हीसुद्धा खूप प्रभावित झालो आहोत.’

मुरलीधरनने श्रीलंकेकडून १३३ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याने ८०० विकेट्स घेतल्या आहेत. म्हणूनच त्याच्या बायोपिकलाही याच आधारावर नाव देण्यात आले आहे. मुरलीने ३५० एकदिवसीय सामन्यांमध्येही भाग घेतला आहे आणि ५३४ बळी घेतले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER