सरसो तेल आणि आयुर्वेदोक्त गुण वर्णन !

Ayurveda - Mustard Oil

तेल हा आहाराचा अविभाज्य घटक आहे. आजकाल विविध प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध आहे. प्रत्येक कंपनी आपले तेल कसे उत्तम हे जाहिरातीव्दारे प्रभाव टाकत असते. तेल ज्या बीजापासून काढले जाते त्या द्रव्याचे गुण त्यात असतात. उदा. तीळ, जवस, सरसो यांचे गुण त्यापासून काढलेल्या तेलात मिळतात.

चरकाचार्यांनी “तैलं वातश्लेष्म प्रशमनानाम् ” असे म्हटले आहे. तेल वात आणि कफदोष कमी करणाऱ्या द्रव्यांमधे श्रेष्ठ द्रव्य आहे. बऱ्याच घरांमधे सरसो किंवा मोहरीचे तेल वापरण्यात येते. उत्तरभारत पंजाब या भागात हे सरसों तेल जास्त उपयोग करतात. लोणची चटण्या यामधे सहसा मोहरीचे तेल वापरतात. बघूया या मोहरीचे तेल कसे परीणाम करते. आयुर्वेद (Ayurveda) ग्रंथात सरसो तेल (Mustard Oil) वर्णन करतांना म्हटले आहे.

कटूष्णं सार्षपं तीक्ष्णं कफशुक्रानिलापहम् ।
लघुपित्तास्रकृत्कोठ कुष्ठार्शो व्रणजंतुजित् ॥

सरसों तेल तिखट, तीक्ष्ण, पचायला हलके, कफ शुक्र वात दोष कमी करणारा आहे. हे उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे पित्त रक्त कोप म्हणजेच दुष्टी करणारे आहे. सरसो तेल त्वकविकार, कुष्ठ, अर्श ( मूळव्याध) व्रण जंत यांचा नाश करणारे आहे.

सरसों तेल हे उष्ण तीक्ष्ण कफ वात कमी करणारे आहे. त्यामुळे सर्दी, नासास्राव, नाक बंद होणे या विकारांवर नस्य म्हणून सरसो तेल उपयोगी आहे.

  • सांधेदुखी असेल तर या सरसों तेलाने मालीश केल्यास आराम पडतो.
  • त्वचाविकार, अर्श, कृमिविकार असणाऱ्यांनी सरसो तेल आहारात वापरावे. या विकारांच्या चिकित्सेला मदत होते व विकार लवकर बरे होतात.
  • सरसों तेलाचा उपयोग आहार, नस्य, मालीश यात केला जातो.
  • ज्यांची पित्त प्रकृती तसेच पित्तविकारांचा त्रास असेल तर सरसों तेल आजार वाढवू शकते.

व्याधी झाला की चिकित्सा वैद्याचा सल्ला हा आवश्यकच आहे. परंतु आहार, चिकित्सेचा स्वस्थ राहण्याचा महत्त्वाचा भाग आहे. आहार घटकांचे गुण माहिती आयुर्वेदात आचार्यांनी सांगितली आहे त्यानुसार वैद्य व्याधी प्रकृती इ. चा विचार करून तेल कोणते वापरावे किंवा पथ्य काय असावे याचे मार्गदर्शन करतो.

ह्या बातम्या पण वाचा :

Vaidya Sharwari Sandeep Mishal

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button