मिशीवाला पक्षी ! मूंछे हो तो…

Mustache bird

मुंबई : सोशल मीडियावर अनेक गमतीदार व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत असतात. यातील काही इतके सुंदर असतात, की त्यांच्यावरून नजर हटत नाही. आयपीएस अधिकारी दीपांशू काबरा यांनी असाच एका अनोख्या पक्ष्याचा फोटो शेअर केला आहे. त्याला चक्क मिशा आहेत!

या पक्ष्याला पाहून अमिताभ बच्चन यांचा गाजलेला संवाद ‘मूंछे  हो तो नत्थू लाल जैसी…’ आठवतो. दीपांशू काबरा यांनी हा फोटो शेअर करताना ‘मूंछे हो तो…’ असेच शीर्षक दिले आहे. या पक्ष्याचे नाव आहे इंका टर्न. लोक सोशल मीडियावर या पक्ष्याचा फोटो पाहून आश्चर्यचकित झालेत.

अनेकांना हा पक्षी म्हणजे कार्टून कॅरेक्टर वाटतो तर अनेकांना ऍनिमेटेड कॅरेक्टर. मात्र हा पक्षी एकदम खराखुरा आहे. याची चोच आणि पाय लाल व मिशा पांढऱ्या आहेत. तो पेरू आणि चिली या देशांच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER