मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा विधान भवनावर धडकला

नागपूर : मुस्लिम समाजाला 5 टक्के आरक्षण देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी जमात उलेमा ए हिंद संघटनेतर्फे आज विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे काल निघालेल्या मराठा समाजाच्या मोर्चापेक्षा आजच्या मुस्लिम समाजाच्या मोर्चेकरांची संख्या दुप्पट होती.

राज्यातील मुस्लिम समाजाला अल्पसंख्यांकांचा दर्जा असून समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना, शासकीय सेवेत आरक्षण ,देण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ज्या प्रमाणे मराठा समाजाला16 टक्के आरक्षण देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजालाही 5 टक्के आरक्षण मिळावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

शिवाय इलाहाबाद उच्च न्यायालयाने शरिया कायद्याप्रमाणे तलाक म्हणजेच घटस्फोट घेऊ शकत नसल्याचा निर्वाळा दिला होता. या निर्णयावर संघटनेतर्फे शरिया कायद्यात शासनाने हस्तक्षेप करू नये अशी मागणीही मोर्च्याद्वारे शासनास करण्यात आली.

nagpur-muslim-morcha
आज काढण्यात आलेल्या या मोर्चात राज्यातील जवळपास 1 लाख मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. उत्तर नागपुरातील इंदोरा चौकातून निघालेला हा मोर्चा LIC चौकात थांबविण्यात आला. त्यामुळे जवळपास 2km चा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता.