भाजपच्या सत्तेत पुन्हा गोहत्येच्या नावाखाली मुस्लिम तरुणाला मारहाण; ओवेसी संतापले

Owaisi

भोपाळ : निवडणुका संपल्या, निकाल हाती आले आणि पुन्हा काही कथित गोरक्षकांची दादागिरी सुरू झालेली पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील सिवनीमध्ये गोरक्षकांनी रिक्षातून गोमांस नेत असल्याच्या संशयावरून महिलेसह दोन  मुस्लिम तरुणांना लाठीकाठीनं मारहाण केल्याची घटना घडली .

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मुस्लिम तरुणांना मारहाण करणारी ही व्यक्ती श्रीराम सेनेचा अध्यक्ष शुभम बघेल आहे. पोलिसांनी शुभमला अटक केली आहे.

या प्रकरणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी संतापले असून ट्विटरवरून नरेंद्र मोदींना त्यांनी प्रश्न विचारले आहेत.