गुढीपाडव्यापासून सुरु होणारा ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव यंदा रद्द

Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचा (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Mandir) ३८ वा वर्धापनपदिन ; सलग दुस-या वर्षी महोत्सव होणार नाही.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी गुढीपाडवा (Gudi Padwa) ते रामनवमी दरम्यान संगीत महोत्सवाचे आयोजन केले जाते. मंदिराचा यावर्षी 38 वा वर्धापन दिन आहे. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षीचा संगीत महोत्सव व इतर कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली.

चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडव्याला दरवर्षी संगीत महोत्सवाला प्रारंभ होतो. गेली अनेक वर्षे स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मागील वर्षी कोरोनामुळे हा संगीत महोत्सव होऊ शकला नाही. यावर्षी देखील कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यामध्ये वाढत असल्याने महोत्सव रद्द करण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button