पंजाबचा मशरुम किंग, दोन एकरात घेतायेत १.५ कोटीचं उत्पन्न

Mushroom King of Punjab

टिव्हीचा वापर योग्य कारणासाठी केला तर नक्कीच आयुष्यात क्रांतीकारी बदल घडू शकतात. असाच लाभदायक उपयोग पंजाबच्या टांडा गावचे रहिवासी संजीव सिंग यांनी केलाय. ते १९९२पासून मशरुमचे उत्पादन घेत आहेत. पंचकृषीत त्यांनी मशरुम किंग (Mushroom King) अशी ख्याती कमावलीये. वयाच्या २५व्या वर्षापासून त्यांनी शेतीसोबत मशरुम उत्पादनाला सुरुवात केली. आज देशभरात त्यांनी ओळख कमावलीये. संजीव सिंग सांगतात की त्यांना मशरुम उत्पादनाची प्रेरणा दुरदर्शन चॅनेलवरच्या ‘मेरा पिंड मेरा गॉँव’ (Mera Pind Mera Gaon) या कार्यक्रमातून मिळाली.

त्यावेळी ते महाविद्यालयात शिक्षण घेत होते. हा कार्यक्रम बघून त्यांनी मशरुम शेतीबद्दल अधिकची माहिती घ्यायला सुरुवात केली. मशरुम उत्पादनाला सुरुवात करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मशरुम शेतीबद्दल त्यांनी संशोधन केलं. मशरुम उत्पादनाच्या सर्व अंगांचा त्यांनी अभ्यास केला. आणि संभावित बाजाराबद्दल माहिती मिळवली.

पंजाबच्या कृषी विद्यापीठात त्यांनी मशरुम शेतीसंबंधी एका वर्षाचा कोर्स पुर्ण केला. कापडी पिशव्यांमध्ये मशरुमचे उत्पन्न घेणे संभावीत आहे. मशरुम उत्पादनासाठी मातीची नाही तर जैविक खताची गरज असल्याच त्यांनी ओळखलं. जैविक खताची सहज उपलब्धी ध्यानात घेवून त्यांनी मशरुम उत्पादनाला सुरुवात केली.

५४ वर्षीय संजीव सांगतात, “त्या काळात कुणीच मशरुम शेती करत नव्हतं. त्यामुळं मशरुम शेती स्वतः प्रयोगातून शिकण्याच मी ठरवलं. मशरुमबद्दल लोकांमध्ये जागरुकता नव्हती. मशरुमचे बियाणेसुद्धा स्थानिक बाजारात मिळायचे नाहीत. ते खरेदी करण्यासाठी त्यांना दिल्लीला जावं लागायचं.

वैज्ञानिक पद्धतीचा केला अवलंब

हंगामानूसार मशरुम उत्पादनाला संजीव यांनी सुरुवात केली. सामान्य शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्नासाठी मशुरुम शेतीला त्यांनी सुरुवात केली. गुणवत्तापूर्ण मशरुम बनवण्यासाठी आणि स्थिर बाजारात विकण्यासाठी त्यांना आठ वर्ष संघर्ष करावा लागला.

२००१ला त्यांनी एक खोली बांधून घेतली. त्यावर सहा मेटलची रॅक बनवली. जैविक खतांनी पिशव्या भरल्यानंतर त्या रॅकवर ठेवल्या. इथं एक नियंत्रित वातावरण बनवण्यात आलं. पोत्यांमध्ये जैविक खत, नायट्रोजन आणि युरीयो समप्रमाणात मिसळून एकत्र भरला.

खाद्य खरेदीचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी कंपोस्ट युनिट बनवून घेतले. वर्ष २००८ला त्यांनी मशरुमचे बी बनवण्याच्या प्रयोगाला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी प्रयोगशाळा बनवली. हळू हळू कामाचे व्याप वाढत गेलं. एका खोलीत सुरु झालेला हा प्रयोग दोन एकरापर्यंत विस्तारला.

कमी जागेत जास्त कमाई

संजीव यांनी घेतलेल्या रात्रंदिवस मेहनतीन शेवटी परतावा द्यायला सुरुवात केली. त्यांचं मशरुम प्रतिदिन सात क्विंटलवर पोहचल. आता त्यांनी बनवले बीज आणि इतर उत्पादनं जम्मू, जालंधर, हरियाणा, हिमाचल आणि इतर राज्यात पोहचत आहेत. सध्या संजीव सिंग यांचं वार्षिक उत्पन्न १.२५ कोटींच्या घरात आहे. त्यांच्या यशाचे श्रेय ते मशरुमच्या लाभदायक बाजाराला देतात.

पुढं ते सांगतात, “मशरुममध्ये चांगले उत्पन्न मिळत असले तरी शेती क्षेत्रात होणारी घट चिंतेचा विषय आहे. त्यासाठी उभी शेती (व्हर्टीकल फार्मिंग) करणं गरजेच आहे. त्यामुळंच ते वर्षाला १.५ कोटी रुपये उत्पन्न घेतायेत. सामान्य शेतीवर इतके उत्पन्न घेण्याठी त्यांना २०० एकर क्षेत्राची गरज पडली असती असंही ते सांगतात.

२०१५ला पंजाब सरकारने त्यांना प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मानित केलं. ‘मशरुम किंग’ या नावानं ओळख कमावलीये. मशरुम उत्पन्न वर्षभर घेणं शक्य आहे. पिकांची मातीवर असलेलं अवलंबनही कमी करता येतं. यातून शेतकरी तगडी कमाई करु शकतात असंही ते सांगतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER