अन् शरद पवारांबद्दल बोलताना मुश्रीफांना अश्रू अनावर

sharad pawar & Hassan Mushrif

मुंबई :- राष्ट्रवादीचे सर्वसर्वो शरद पवार (Sharad Pawar) आज 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनीही पवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच शरद पवारांशी संबंधित आठवणींना उजाळा देतांना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

शरद पवार यांनी राजकारणात दिलेली संधी, केलेलं मार्गदर्शन या विषयाचे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी एक किस्साही आवर्जून सांगितला, तो होता 2009 च्या विधानसभा निवडणूक निकालानंतरचा. 2009 च्या विधानसभा निवडणुकीआधी सांगली जिल्ह्यातील मिरज येथे गणेशोत्सवादरम्यान जातीय दंगल झाली. त्याचा परिणाम म्हणून त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा फटका बसला.

मात्र याही परिस्थितीत मुश्रीफ कागलमधून विक्रमी मतांनी निवडून आले होते.. या निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी माझा कार्यकर्ता निवडून आला याचा मनस्वी आनंद असल्याचा उल्लेख केला होता. यासंदर्भात अनुभव सांगताना मंत्री मुश्रीफ यांचे डोळे पाणावले.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकुया : हसन मुश्रीफ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER