शेतकऱ्यांना ऊसदर वाढ कोणामुळे मिळाला हे मुश्रीफ विसरले : शेतकरी संघटना

Raju Shetty

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्यासह शेतकरी संघटनांनी केलेल्या आंदोलनाचे फलीत म्हणून शेतकऱ्यांच्या ऊसाला आज तीन हजार रुपये दर मिळत आहे. ऊसदर वाढ आंदोलनाची गरज काय? असे वक्तव्य करणाऱ्या ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दरवाढ कोणामुळे मिळाली याची विसर पडला काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार हे कृषीमंत्री असताना एफआरपी कायदा आणला त्यावर दर निश्चीत होतात. कोल्हापूर जिल्हयामध्ये एकरकमी एफआरपी दिली जात असताना अन्य जिल्हयामध्ये त्याचे तुकडे केले जातात. त्यामुळे ऊस परिषद व ऊसाचे आंदोलन कशासाठी हे कोडेच असल्याचे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी गडहिंग्लज येथे गोडसाखरच्या ४२ व्या गळीत हंगामावेळी केले.

ना. मुश्रीफ यांच्या वक्तव्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तिव्र नापसंती व्यक्त केली. प्रा. पाटील म्हणाले, गेली १९ वर्षे जयसिंगपूर येथे होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयानंतर राज्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होते. राज्यभरातून शेतकऱ्यांची असणारी उपस्थिती परिषदेचे महत्व अधोरेखित करते. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनाचे फलीत म्हणूनच उसाला चांगला दर मिळत आहे. त्यासाठी आंदोलन पेटली. लाखो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. हजारोंवर केसेस दाखल झाल्या. अनेकांनी हुतात्म पत्करले. कार्यकर्त्यांचे बलीदानाचे फलीत म्हणून शेतकऱ्याला चार पैसे जादा मिळत आहेत. उसदर वाढ आंदोलन नसते तर शेतकऱ्याची अवस्था अजून वाईट झाली असती, याचा ना. हसन मुश्रीफ यांना बहुदा विसर पडला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER