व्हिडिओमध्ये दिसते आहे की जसे मुशफिकूरने मारण्यासाठी हात उचलला, कदाचित तो चुकत आहे हे त्याला कळले आणि लगेच त्याने स्वत: वर नियंत्रण ठेवले. यानंतर मुशफिकर हा त्याचा सहकारी खेळाडू अहमदला समजावतानाही दिसला.
बांग्लादेशचा (Bangladesh) खेळाडू मुशफिकुर रहीमने (Mushfiqur Rahim ) घरगुती टी -२० स्पर्धेत (बंगबंधू टी -२० स्पर्धेत) आपल्या साथीदाराला मैदानावर झापड मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्ट झाले आहे की बंगबंधू टी -२० स्पर्धेत बेक्सिमको ढाकाचा कर्णधार मुश्फिकुर रहीम आपला राग हाताळू शकला नाही आणि त्याने स्वतःचा संघाचा खेळाडू नसुम अहमदला मैदानात फटकारण्यासाठी हात उंचावला.
वास्तविक, झेल पकडण्याच्या प्रयत्नात असताना नसुम आणि मुशफिकुर रहीम एकमेकांशी भिडले. झेल पकडण्याचा प्रयत्न करताना ते दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ आले. या दरम्यान रहीमने झेल पकडला, परंतु त्याने नसुम अहमदलाही चापट मारण्याचा प्रयत्न केला.
Calm down, Rahim. Literally. What a chotu 🐯🔥
(📹 @imrickyb) pic.twitter.com/657O5eHzqn
— Nikhil 🏏 (@CricCrazyNIKS) December 14, 2020
व्हिडिओमध्ये दिसते आहे की जसे मुशफिकूरने मारण्यासाठी हात उचलला, कदाचित तो चुकत आहे हे त्याला कळले आणि लगेच त्याने स्वत: वर नियंत्रण ठेवले. यानंतर मुशफिकर हा त्याचा सहकारी खेळाडू अहमदला समजावतानाही दिसला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला