
बांगलादेशी (Bangladesh) क्रिकेटपटू मुशफिकूर रहिमने (Mushfiqur Rahim) ज्याच्यावर संताप व्यक्त केला तो ज्युनियर खेळाडू नासूम अहमदची (Nasum Ahmed) माफी मागितली आहे. या प्रकरणात मुशफिकूरला मॕच फीच्या 25 टक्के रकमेचा दंड करण्यात आला आहे शिवाय त्याच्यानावे बेशिस्त वर्तनासाठी एक डीमेरीट गूणसुध्दा नोंदण्यात आला आहे. बंगबंधू टी-20 कप स्पर्धेच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना झेल टिपण्यावेळी मुशफिकूर व अहमदची टक्कर थोडक्यात टळली होती आणि त्यानंतर मुशाफिकूरने अहमदला ठोसा लगावण्याची धमकी दिली होती. हा सामना या दोघांचा संघ बेक्झिम्को ढाकाने जिंकला होता.
यासंदर्भात बांगलादेश क्रिकेट मंडळाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहिमला सामन्याच्या मानधनाच्या 25 टक्के रकमेचा दंड करण्यात येत आहे आणि
सहकाऱ्यांशी अपमानास्पद वर्तणूकीसाठी त्याच्या नावे एक डीमेरिट गूणसुध्दा नोंदण्यात आला आहे. रहिमच्या नावावर स्पर्धेदरम्यान असे चार गूण लागले तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होईल आणि त्याला बंदीची शिक्षा होईल.
या प्रसंगावेळी अफिफ हुसेनने एक फटका मिडविकेटच्या क्षेत्रात लगावला असता मुशफिकूर व अहमद दोन्ही झेल घेण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळी मुशफिकुरने झेल पूर्ण केल्यानंतर अहमदवर हात उगारला होता.
या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी मुशफिकूरने एका फेसबूक पोस्टद्वारे अहमदची माफी मागितली मात्र सामन्यानंतरच्या पारितोषीक वितरण समारंभात मुशफिकूरने दिलगिरी व्यक्त करण्याचे टाळले होतेआणि त्याच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूकडून ज्युनियर खेळाडूसोबत अशा वर्तनाबद्दल टीका झाली होती.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला