ठाण्यात शिवसेना नगरसेवकाच्या मुलाची हत्या

Murder of Shiv Sena corporator son in Thane

ठाणे :- ठाण्यात (Thane) शिवसेनेचे (Shiv Sena) नगरसेवक माणिक पाटील यांच्या मुलाची हत्या (Murder) झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राकेश पाटील असं मृतकाचे नाव आहे. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून राकेश याचाच सावत्र भाऊ सचिन पाटील असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, संपत्तीच्या वादातून ही झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

राकेश पाटील (Rakesh Patil) हा ३४ वर्षांचा होता. त्याचा मृतदेह वाशी खाडीत फेकल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने गुरुवारी पोलीस मृतदेहाचा शोध घेत होते मात्र त्यांचा हाती काही आले नाही. याप्रकरणी कासारवडवली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सचिन पाटीलचा साथीदार गौरव सिंह याला अटक केली आहे. तर सचिन पाटील हा फरार आहे, त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

माणिक पाटील हे शिवसेनेचे श्रीनगर भागातील नगरसेवक आहेत. त्यांचे घर घोडबंदर रोडवरील वाघबिळ गावात आहे. काही दिवस आधी, ते त्यांच्या पत्नीसह उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल झाले होते. २० सप्टेंबरला रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांना घरातील तिजोरी फोडल्याचे दिसून आले. तिजोरीतील साडे तीन किलो सोने देखील गायब असल्याचे आढळले. तसेच त्यांचा मुलगा राकेश याचा शोध घेतला असता तो देखील कुठेच आढळला नाही. तर याप्रकरणी माणिक पाटील यांनी राकेश बेपत्ता असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात केली होती. दरम्यान पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास सुरू असताना राकेश याचा खून झाला असून तो माणिक पाटील यांचा वाहन चालक गौरव सिंह याने केला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सापळा रचून आझादनगर येथून गौरवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली.

गौरवने सांगितलेल्या माहिती प्रमाणे, संपत्तीसाठी सचिनने राकेशच्या हत्येचा कट रचला होता. राकेश हा आपल्या पत्नीसह वेगळा राहत होता. तो माणिक पाटील यांच्या पहिल्या पत्नीचा तर सचिन हा तिसऱ्या पत्नीचा मुलगा आहे. त्यामुळे त्यांच्यात संपत्तीवरून वाद सुरू होते. याचाच राग मनात ठेऊन, २० सप्टेंबरला सचिनने राकेशवर गोळी झाडून हत्या केल्याचे गौरवने सांगितले. तसेच हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आम्ही राकेशचा मृतदेह वाशी खाडीत फेकून दिल्याची कबुली गौरवने दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER