सांगली नजीकच्या तुंग मध्ये लैंगिक अत्याचार करून सात वर्षाच्या बालिकेचा खून

Murder

सांगली : मिरज तालुक्यातील तुंग गावानजिकच्या वसाहतीमधील सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. बुधवारी सायंकाळी दुकानातून खायला आणण्यासाठी गेलेली बालिका बेपत्ता होती. गुरुवारी सकाळी ऊसाच्या शेातत निपचिप पडलेला कोवळा जीव दिसताच संतप्त प्रतिकिया उमटली.

तुंग गावापासून काही अंतारावर धरणग्रस्तांची वसाहत वसवण्यात आली आहे. विठ्ठलाई नगर , चांदोली वसाहतीमध्ये राहणारी सात वर्षाची मुलगी खावू घेऊन येते म्हणून घरातून बाहेर पडली. दुकान जवळच असताना ती अजून कशी आली नाही, म्हणून नातेवाईकांनी रात्री उशीरापर्यंत्त तिचा शोध घेतला. गुरुवारी सकाळी पुन्हा तिचा शोध सुरु झाल्यानंतर वसाहतीपासून

जवळच असलेल्या उसाच्या शेतात ती मृतावस्थेत सापडली. तिचा आवस्था पाहता तिच्यावर अमानुषरित्या लैंगिक अत्याचार करुन तिचा गळा आवळल्याचे वाटत होते. तिच्या अंगावरील कपड्यानेच चिमुरडीचा गळा आवळल्याचेही दिसले. या गंभीर घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपाधिक्षक अशोक वीरकर, ग्रामीण पोलीस ठाण्याकडील सहाय्यक पोलीस निरिक्षक उमेश दांडिले यांचे पथक घटना स्थळी पोहचले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथकही धावत आले. श्‍वानपथक आणि फॉरेन्सिक लॅबचे पथक ही घटनास्थळी दाखल होऊन तपास कार्य सुरू झाले. पोलीसांनी आजूबाजूच्या परिसरात संशयीताच्या दृष्टीने काही धागेदोरे हाती लागावेत म्हणून प्रयत्न सुरु ठेवले.

दरम्यानच्या काळात त्या बालिकेचा मृतदेह सांगलीच्या सरकारी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर बालिकेवर अमानुषरित्या लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेसंदर्भात अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्याशी संपर्क साधला असता, त्या म्हणाल्या. अतिशय गंभीर घटना आहे. लहानगीवर बलात्कार करुन तिचा खून केल्याचे समोर आले आहे. संशयीताचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. परिस्थिती जन्य पुराव्यांच्या दृष्टीने पंचनामा करण्यात आला आहे. लवकरात लवकर संशयीत ताब्यात येईल, यासाठी पोलीसांचे प्रयत्न सुरु आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला