पॅरोलवर सुटताच कैद्याचा खून

Murder

पुणे : भांडणांच्या खटल्यातील कैदी नितीन शिवाजी कसबे (२२) हा पॅरोलवर कारागृहाच्या बाहेर येताच काही तासात बुधवारी रात्री त्याचा खून झाला.नितीन याच्याविरुद्ध मारामारीचे अनेक खटले आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याची कारागृहात रवानगी झाली. त्याच्या टोळीतील नागेश कांबळे याचा मेहुणा कै. निहाल लोंढे याचा बुधवारी जन्मदिन होता. त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी नितीन सागर कसबे, नागेश कांबळे, कुणाल चंदाले यांच्यासोबत गेला होता.

नैवेद्य दाखवून तो परत येत असतानां शाद्वलबाबा चौक ते पर्णकुटी दरम्यान आकाश कलचिले आणि त्याच्या साथीदारांनी नितीनवर हल्ला केला. हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपीना अटक केली असून आकाश कलचिले आणि एकूण १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER