तो ”राज सरकार” ग्रूप चालवायचा? सराईत गुन्हेगार शोएबचा पूर्ववैमनस्यातून खून

Murder

पुणे : लॉकडाऊनमध्येही पुण्यात हडपसर येथे पुर्ववैमनस्यातून खून झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भेकराईनगरमधील सासवड रोडवरील शारदा हॉस्पिटलशेजारील गल्लीत शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजता घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ७ ते ८ जण दिसून येत आहेत.

शोएब मस्जीद शेख (वय १९, रा. भेकराईनगर, हडपसर) असे खुन झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी निलेश भाऊसाहेब मेमाणे (वय २६, रा. ढमाळवाडी, भेकराईनगर, हडपसर) या टेम्पोचालकाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोएब हा हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.त्याच्यावर मारहाणीचे अनेक गुुन्हे दाखल आहेत.

आरोपी जीवन कांबळे व शोएब एकाच परिसरात राहणारे आहेत. पूर्वी ते मित्र होते. ऑक्टोंबर २०१८ मध्ये शोएब व जीवन कांबळे त्यांच्यात वाद झाला होता. तेव्हा शोएब याने त्याला मारहाण केली होती. तो राग कांबळेच्या मनात होताच. संधी बघून कांबळेनी शोएबचा काटा काढला असावा अशी परिसरात चर्चा आहे. दोघांवरही खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता.

गेल्या वर्षी निवडणुकीपूर्वी त्यांना जामीन मिळाला होता. खून झालेल्या शोएबचा राज ठाकरेशी संबंध आहे का अशीही चर्चा आहे. कारण शोएब हा राज सरकार फेसबूक ग्रूप चालवत होता. अशी माहिती लोकमतने दिली आहे.

शुक्रवारी सकाळी शोएब जीवन कांबळे याच्या घरासमोर गेला व त्याने शिवीगाळ केली होती. त्यामुळे जीवन कांबळे व त्याच्या साथीदारांनी काल रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास भेकराईनगर येथे एकट्याला गाठले व त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खुन केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सुहास बावचे व अन्य वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जीवन कांबळे याच्याबरोबर असणार्‍या तिघांना ताब्यात घेतले असून कांबळेचा शोध घेण्यात येत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER